Shivendra Raje Bhosale Dainik Gomantak
गोवा

Shivendra Raje Bhosale : शिवरायांच्या वंशजांनी केले गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक, वाचा काय म्हणाले...

साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Saptakoteshwar Temple : धर्मासह आपल्या लोकांचे रक्षण करणे ही राजाची भूमिका आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे लोकशाहीतून निवडून आलेले राजे आहेत. त्यांनी सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.

त्याचप्रमाणे अयोध्येतील राम मंदिर आणि इतर मंदिरांचा जीर्णोद्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य आहे असे गौरोद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.

नार्वे-डिचोली येथील श्री सप्तकोटीश्वर नूतनीकृत मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, "मंदिरे ही आपली परंपरा आहे. मंदिरे ही केवळ कार्यक्रमांपुरती मर्यादीत नाहीत. तर मंदिरांतून ऊर्जा मिळत असते."

"आपल्या देशाला मंदिरांचा वैभवशाली इतिहास आहे. परकीय आक्रमणांमध्ये मुघल, ब्रिटीशांनी हिंदू समाजाची मंदिरे नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न देशभरामध्ये केला. सर्वसामान्यांना एकत्र घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना रोखण्याचे काम केले.

शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला हा एक इतिहास जागा ठेवण्याचे काम मुख्यमंत्र्यी करत आहेत असे असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT