वास्को: हेडलॅण्ड सडा येथील श्री इस्वटी ब्राम्हण लक्ष्मीनारायण देवालयात पारंपारिकरित्या पूजण्यांत आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता आज बुधवार दि.14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा सडा परिसरात भव्य मिरवणुकीने करण्यात आली.
सडा भागातील पुर्वजांनी सुरु केलेला व गेल्या 100 हून अधिक वर्षांची परंपरा असलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आजही कोणताही बदल न करता पूर्वापार चालl आलेली परंपरा कायम ठेवून उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
चतुर्थीदिनी श्री गणेशाची फोटो प्रतीमा एका सजवलेल्या मखरात ठेवून तिचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दररोज भजन करण्यात आले. दरम्यान आज परंपरेनूसार 15 दिवसांनी सडा परीसरातून श्रीगणेशाची फोटो मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पुनश:च मंदिराजवळ आल्यावर फोटो प्रतिमा परत मंदिरात ठेवली.
विर्सजन मिरवणुकीपुर्वी सुरवातीला स्थानिक भजनी कलाकारांच्या भजनाची बैठक झाली. शेवटी भैरवी, आरती, व तिर्थप्रसादाने या गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. सडावासियांनी श्रींचे भव्य स्वागत केले. यावेळी देवालय समितीतर्फे मिरवणूकी दरम्यान भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रेमानंद केरकर, सुरज घोणसेकर, दिलीप शेरलेकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.