Goa Tiger Reserve Dainik Gomantak
गोवा

Tiger In Goa: पट्टेरी वाघाचा लोलयेमध्ये संचार

Tiger In Goa: लोलये पंचायत क्षेत्रात पट्टेरी वाघाचा संचार असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच निशा च्यारी यांनी वन खात्याकडे केली आहे. या पट्टेरी वाघाने अनेक गुरे व पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे.

दैनिक गोमन्तक

Tiger In Goa: लोलये पंचायत क्षेत्रात पट्टेरी वाघाचा संचार असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच निशा च्यारी यांनी वन खात्याकडे केली आहे. या पट्टेरी वाघाने अनेक गुरे व पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे.

तसेच या वाघापासून स्थानिकांनाही धोका संभवत असल्याचे येथील रहिवाशांचे मत आहे. यापूर्वी पंचायतीच्या जैवविविधता समितीचे अध्यक्ष मनोज प्रभुगावकर यांनी या पट्टेरी वाघाच्या संचाराचा विषय पुढे आणला होता. यासंदर्भात वन खात्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, लोलये पंचायत क्षेत्राला कर्नाटक राज्याची सीमा जवळ असल्याने या पट्टेरी वाघाचे स्थलांतर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

कष्टी-उगे येथील जंगलातदेखील सध्या पट्टेरी वाघाचा संचार असल्याचे दिसून येत आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास एका मोटारसायकल चालकाला वाघाचे दर्शन झाले. रस्त्यावरून ऐटीत चालत वाघ जंगलात गेला.

राज्यात व्याघ्रप्रकल्प व्हावा की नाही यावर दोन मते आहेत. पर्यावरणप्रेमींना राज्यात व्याघ्र प्रकल्प हवा असून राज्य सरकार गोव्यात व्याघ्रप्रकल्प येऊ नये या पवित्र्यात आहे.

सध्या हा विषय न्यायालयात असताना आता लोकांना चक्क पट्टेरी वाघ दिसू लागले आहेत. दुचाकीस्वाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो पणजीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

बुधवारी रात्री पणजीहून कामावरून कष्टी येथे आपल्या घरी जायला तो बाहेर निघाला आणि पावणे अकराच्या सुमारास कष्टी आणि उगे गावाच्या जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर त्याला पट्टेरी वाघ ऐटीत रस्ता ओलांडून जंगलात जाताना दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT