Goa Panchayat Elections maye Dainik Gomantak
गोवा

मये-वायंगिणी पंचायतीला सरपंच बदलाचे वेध

विद्यमान सरपंचांनी दर्शविली राजीनाम्याची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

गत पंचायत मंडळाच्या कार्यकाळात सत्तासंघर्षात आघाडीवर राहिलेल्या मये-वायंगिणी पंचायतीला आता सरपंच बदलाचे वेध लागले आहेत. सत्ताधारी गटात झालेल्या अंतर्गत करारानुसार विद्यमान सरपंच दिलीप शेट यांची सहा महिन्यांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांनी आता सरपंचपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत म्हणजेच चालू महिन्याच्या अखेरपर्यंत शेट सरपंचपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

खुद्द सरपंचांकडूनही या माहितीस दुजोरा मिळाला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या पंचायत निवडणुकीत अकरा प्रभागांची असलेल्या मये पंचायतीवर भाजप समर्थक गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

मात्र, सुरवातीपासूनच किमान पाच पंचसदस्य सरपंचपदासाठी इच्छुक होते. मात्र, पंचायत भाजपच्या ताब्यात ठेवण्यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पुढाकार घेताना भाजप समर्थक गटाच्या पंचसदस्यांबरोबर बैठका घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी अंतर्गत कराराचा तोडगा काढला. या करारानुसार इच्छुकांना सरपंचपद विभागून देण्याचे ठरविण्यात आले.

पद सोडण्यास तयार

सुरवातीच्या सहा महिन्यांसाठी दिलीप शेट यांना सरपंचपद देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार दिलीप शेट यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. अंतर्गत करारानुसार दिलीप शेट यांचा सरपंचपदाचा कार्यकाळ गेल्याच मंगळवारी (ता.२१) संपुष्टात आला आहे. त्यामुळे करारानुसार दिलीप शेट सरपंचपदावरून उतरण्यास तयार झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT