Siolim Sao Joao Dainik Gomantak
गोवा

Sao Joao: भव्य बोट परेड, रंगीबेरंगी फ्लोट्स, ढोल-ताशांचा गजर! शिवोलीत होणार ‘सांजाव’चा जल्लोष

Siolim Sao Joao: एका भव्य पारंपरिक बोट परेडने या उत्सवाची सुरवात होणार आहे. रंगीबेरंगी फ्लोट्स, पारंपरिक पोशाखातील सहभागी आणि नयनरम्य जलमिरवणूक ही उत्सवाची खासियत ठरणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: पर्यटन खात्याच्या पुढाकाराने आणि शिवोली सांजाव पारंपरिक बोट महोत्सव व सांस्कृतिक संघटनेच्या सहकार्याने ‘सांजाव २०२५’ उत्सव २४ जून रोजी साजरा केला जाणार आहे.

शिवोली येथील सेंट अँथनी चर्चसमोरील नदीकाठच्या निसर्गरम्य स्थळावर सांजाव पार पडणार आहे. या महोत्सवात गोव्याच्या पारंपरिक सांस्कृतिक वारशाचा जलपूर्ण सोहळा पाहायला मिळणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

या महोत्सवाला पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मत्स्यउद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, पर्यटन सचिव संजीव आहुजा, पर्यटन संचालक केदार नाईक तसेच जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर यांची उपस्थिती असणार आहे.

लोकनृत्यांसह युवा बँड्सचे संगीत

एका भव्य पारंपरिक बोट परेडने या उत्सवाची सुरवात होणार आहे. रंगीबेरंगी फ्लोट्स, पारंपरिक पोशाखातील सहभागी आणि नयनरम्य जलमिरवणूक ही उत्सवाची खासियत ठरणार आहे. गोवा पर्यटनही या मिरवणुकीत खास डिझाइन केलेल्या बोटीने आणि त्यांच्या मान्सून मास्कॉटसह सहभागी होणार आहे. उत्सवात पारंपरिक लोकनृत्ये, ढोल-ताशांच्या गजरात उत्साहवर्धक सादरीकरणे तसेच क्ले जार्स, जॉनी बी गुड आणि रेझा या लोकप्रिय युवा बँड्सचे थरारक संगीतमय सादरीकरण हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

केदार नाईक, पर्यटन संचालक

शिवोलीतील सांजाव उत्सव हा केवळ एक सण नाही, तर गोव्याच्या मान्सून संस्कृतीचा आत्मा आहे. तो समाजातील विविध स्तरांना एकत्र आणतो, स्थानिक ओळखीचा गौरव करतो आणि पर्यटकांनाही गोव्यातील खरी सांस्कृतिक अनुभूती देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: सांतिनेझ परिसरातील तिसवाडी येथे एफडीए मोहीम

Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Crime: 2 वर्षांत 256 देशी-विदेशी पर्यटकांबाबत गुन्‍ह्यांच्‍या घटना! मुख्‍यमंत्र्यांची माहिती; सर्वाधिक प्रकरणे चोरीची

Goa Vegetable Import: शेतीमालासाठी गोवा कर्नाटक, महाराष्‍ट्रावर अवलंबून! 20639 मेट्रिक टनची तफावत; कांदाबटाट्याची वाढली आयात

Liquor Seized: गोव्यात चेकनाक्‍यांवर 3.14 कोटींची दारू जप्‍त! मागच्या वर्षी मोठी कारवाई; मुख्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT