Santainez Animal Sterilization Centre Dainik Gomantak
गोवा

Santainez Animal Sterilization Centre: सांतिनेजमधील निर्बिजीकरण केंद्र बंद! निधी मंजूर न झाल्यामुळे 'पीएडब्ल्यूएस' ने घेतला निर्णय

Santainez Animal Sterilization Centre Closed: महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘पणजी ॲनिमल वेल्फेअर सोसायटी’ (पीएडब्ल्यूएस) शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरणाचे काम करते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘पणजी ॲनिमल वेल्फेअर सोसायटी’ (पीएडब्ल्यूएस) शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरणाचे काम करते. या सोसायटीचे काम गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. गेल्या वर्षभरापासून सोसायटीच्या खर्चापोटीचे ७० लाख रुपयांचे अनुदान वित्त खात्यातील फाईलमध्ये अडकून पडल्याने सोसायटीला आपला उपक्रम दहा दिवसांपासून बंद ठेवावा लागला आहे.

याविषयी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सरदेसाई यांनी सांगितले की, सोसायटीच्या खर्चाची फाईल (१ एप्रिल २०२५ ते ३० मार्च २०२६) महानगरपालिकेने मंजूर केली. त्यानंतर पशुसंवर्धन खात्यानेही तिची पडताळणी करून मंजुरी दिली. तेथून ती फाईल वित्त खात्याकडे गेली असून, आठ दिवस उलटूनही ती पुढे सरकलेली नाही. त्यामुळे वित्त खात्याकडून निधी न मिळाल्याने सोसायटीने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम बंद ठेवले आहे.

सांतिनेज येथील स्मशानभूमीजवळ ‘पीएडब्ल्यूएस’चे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. राज्य सरकार सोसायटीच्या खर्चाचा भार उचलते, त्यास महानगरपालिकेचेही सहकार्य मिळते. पणजी शहर आणि परिसरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने सोसायटी काम करते. खर्चापोटीची सुमारे ७० लाख रुपयांची रक्कम गोवा सरकारकडून अद्याप जारी न झाल्यामुळे ‘पीएडब्ल्यूएस’ला प्राणी निर्बिजीकरण कार्यक्रम स्थगित करावा लागला आहे.

गेल्या आर्थिक वर्षातील खर्चाची रक्कम अडकली आहे आणि सोसायटीला आर्थिक भार सहन करणे आता शक्य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम थांबवण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. सोसायटीतर्फे वर्षाकाठी साडेतीन हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही संख्या पाच हजारांपर्यंत नेण्याचा आमचा मानस होता.

- डॉ. श्वेता सरदेसाई

जे लोक किंवा संस्था अत्यंत कठीण आणि ज्याचे फारसे कौतुक होत नाही, असे काम करत आहेत, त्यांना सरकारकडील देयके मिळण्यासाठी वाट पाहताना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ढकलणे, हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाचे लक्षण ठरू शकत नाही.

– सुरेंद्र फुर्तादो, माजी महापौर, पणजी महानगरपालिका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

Vitthalapur Sanquelim Bridge: विठ्ठलापूर-साखळी पूल असुरक्षित, पावसाळ्यात साचते तळे; वीज दिव्यांअभावी अंधार; कचऱ्याचे साम्राज्य

India Silent Cholesterol Crisis: भारतात वाढला हृदयविकाराचा धोका, 90 टक्के लोकांचे कोलेस्ट्रॉल असंतुलित; ICMR चा धक्कादायक खुलासा

'आरजी'समोर आता भाजप नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाचं मोठं आव्हान! नेतृत्वातील मतभेदांमुळे पक्षाची घसरगुंडी?

Viral Video: बॉईज हॉस्टेलच्या मेसमध्ये शिरली 5 फुटी मगर; विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ, CCTV मध्ये कैद झाला थरार

SCROLL FOR NEXT