Santa Cruz garbage collection Canva
गोवा

Santa Cruz: 51 लाखांचे कंत्राट दिले 64 लाखांना! सांताक्रुझ पंचायतीत 'कचरा संकलना'वरुन गदारोळ; पंच परेरा आक्रमक

Santa Cruz Waste Collection: सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील दारोदार कचरा संकलन करण्याचे कंत्राट ६४ लाख रुपयांत मिळविणारा कंत्राटदार पाच महिन्यांपूर्वी ५१ लाखांत काम करण्यास तयार होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Santa Cruz Waste Collection Contract

पणजी: सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील दारोदार कचरा संकलन करण्याचे कंत्राट ६४ लाख रुपयांत मिळविणारा कंत्राटदार पाच महिन्यांपूर्वी ५१ लाखांत काम करण्यास तयार होता. कचरा संकलनाची फाईल पाच महिने सचिवांनी स्वतःकडे ठेवल्यामुळे पंचायतीचे सुमारे १३ लाखांचे नुकसान झाले, असा आरोप माजी उपसरपंच तथा पंच इनासियो डॉम्निक परेरा यांनी केला.

इनासियो म्हणाले, माजी सरपंच एडविन यांनी कचरा उचलण्यासाठी डायस ई-टेंडरिंग प्रक्रिया केली. तीच प्रक्रिया आम्हीही सुरू ठेवली. परंतु आपण एक वर्षांच्या उपसरपंचपदावरून हटताच ई-टेंडरिंग प्रक्रियेचा कालावधी संपला. त्यानंतर सरपंचांनी कचरा उचलणारा कंत्राटदार चांगले काम करतो म्हणून त्याच्याशी करार केला.

या कराराबद्दल आम्हाला दुमत नाही. पण त्याचवेळी सांताक्रुझ पंचायतीने दारोदार कचरा संकलनासाठी निविदा काढली. ती फाईल आपण तीन महिन्यांपासून शोधत आहे. त्यासाठी आरटीआयही घातला. नुकतीच १० डिसेंबर रोजी ती फाईल आपणास मिळाली. ती फेब्रुवारी २०२४ मध्ये सचिवांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवायला हवी होती, पण त्‍यांनी ती फाईल पाच महिने स्वतःकडेच ठेवली, असे परेरा यांनी सांगितले.

मी एकमेव विरोधक; तरीही लढत राहीन

सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील लोक ९०० रुपये कचरा कर भरत आहेत. पंचायत मंडळात मी एकमेव विरोधक आहोत. तरीही आपण अशा बेकायदेशीर कामांना कधीच पाठीशी घालणार नाही. भ्रष्‍टाचाराविरोधात, अन्‍यायाविरोधात आवाज उठवत राहणार असल्याचे इनासियो डॉम्निक परेरा यांनी सांगितले. सरकारने कचरा संकलनासाठी पंचायतीला एक ट्रक दिला आहे. तो विनावापर पडून आहे. गटविकास अधिकाऱ्यांना त्याबाबत लिहूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT