Santa Cruz Panchayat fake workers list Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz: सांताक्रुझमध्ये बनावट मजुरांची यादी, सहीच्या ठिकाणी अंगठा केल्याने शंका ; पंचसदस्यांकडून भ्रष्टाचाराची तक्रार दाखल

Santa Cruz Panchayat Scam: पेरेरा यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे सांताक्रुझ पंचायतीमधील कचरा जमा करणाऱ्या मजुरांच्या वेतनात गैरप्रकार व भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार सादर केली होती.

Sameer Panditrao

पणजी: सांताक्रुझ पंचायत परिसरातील कचरा जमा करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या मजुरांच्या नावाची यादी (मास्टर रोल) बनावट असल्याची जोडमाहिती पंचसदस्य इनासिओ परेरा यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला दिली आहे. यापूर्वी त्यांनी पंचायतीच्या कामकाजात भ्रष्टाचार व लाचखोरीची तक्रार दाखल केली आहे.

लेक सर्व्हिसेसच्या मालकाला या मास्टर रोलमध्ये समावेश करण्यात आले आहे. मजुरांना वेतन देताना ते सही करू शकत असले तरी त्यांचा सहीच्या ठिकाणी अंगठ्याचा ठसा घेण्यात येत आहे. त्यामुळे ही यादी अधिकृत की बनावट असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

या मालकाने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोरजी ग्रामपंचायतीत केलेल्या अर्जावर सही केली होती तर सांताक्रुज पंचायतीमध्ये अंगठ्याचा ठसा असल्याने संशय निर्माण झाला आहे. हे जाणुनबुजून केलेले कृत्य असल्याचे दिसून येत आहे.

मजूर वेतनाचा खोटा दावा करण्यासाठी व वाटप करण्यासाठी बनावट नावे किंवा खोट्या पद्धती वापरल्या जात आहेत. ज्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान होत आहे, असे पेरेरा यांनी सादर केलेल्या जोडमाहितीच्या निवेदनात म्हटले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

गेल्या ३१ मे २०२५ रोजी पेरेरा यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे सांताक्रुझ पंचायतीमधील कचरा जमा करणाऱ्या मजुरांच्या वेतनात गैरप्रकार व भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार सादर केली होती. प्रत्येक मजुराला दिवसागणिक ८०० रुपयेप्रमाणे महिन्याला २४,८०० हजार रुपये देणे गरजेचे आहे. २० मजूर नेमणूक केले आहेत. या मजुरांना पूर्ण वेतन न देता फक्त १० हजार रुपये देऊन उर्वरित १४,८०० रुपयांचा हिशोब दाखवला जात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल!

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

IND vs ENG: शुभमन गिलचा डबल धमाका! 59 वर्ष जुना रेकॉर्ड मोडून रचला इतिहास; टीम इंडियाचा 'प्रिन्स' बुलेट ट्रेनसारखा सुस्साट

SCROLL FOR NEXT