Dattawadi Temple Theft Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Temple Theft: साखळी देवस्‍थानात चोरी नाहीच! शास्त्रानुसार मुर्त्या विसर्जित; पदाधिकाऱ्यांचे मामलेदारांवर आरोप

Sanquelim Dattawadi temple theft: निवडणुकीनंतर कामाक्षी देवीकडे प्रसाद घेतला असता देवस्थानात असलेल्या काही मूर्तींमध्ये दोष असल्याचे दाखवले होते. त्या मूर्ती त्वरित विसर्जित करण्याची सूचना आली होती.

Sameer Panditrao

साखळी: येथील श्री दत्त मंदिरात गाजलेले मूर्ती चोरी प्रकरण हे याच देवस्थानातील काही महाजनांनी रचलेले षडयंत्र असून मागील समितीने या मूर्ती विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय प्रलंबित राहिल्याने ते कार्य आम्ही पूर्ण केले.

या मूर्तींचे विसर्जन हे देवाला प्रसाद लावून तसेच शास्त्रानुसार करण्यात आले आहे. त्यात कोणताही चोरीचा प्रकार नाही. याप्रकरणी डिचोलीच्या मामलेदारांनी अधिकारांचा पूर्णत: गैरवापर केला असून त्यांच्याविरोधात मुख्य सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तसेच इतर यंत्रणांकडे खटला गुदरण्यात येणार आहे, असे देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेस सचिव गजानन भट गावकर, मुखत्यार श्याम बोडके, खजिनदार विठ्ठल सामंत, सल्लागार सदस्य दीपेश कामत, ॲड. निहाल कामत, ॲड. शर्मद बोडके, सल्लागार समिती सदस्य नरसिंह भटगावकर, नागेश दाबोलकर, संजय बोडके आदी उपस्थित होते. साखळीतील श्री दत्तात्रय मंदिरात कोणत्याही मूर्तींची चोरी झालेली नाही.

तीन मूर्ती नार्वे तीर्थावर विसर्जित केल्या आहेत. प्रसाद पाकळीत काही देवस्थानांत काही दोष असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार समितीच्या निवडणुकीनंतर आम्ही कामाक्षी देवीकडे प्रसाद घेतला असता देवस्थानात असलेल्या काही मूर्तींमध्ये दोष असल्याचे दाखवून देण्यात आले होते. त्या मूर्ती त्वरित विसर्जित करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार आम्ही दत्त मंदिरात येऊन दत्त महाराजांना सांगणे केले आणि त्या मूर्ती नार्वे तीर्थावर विसर्जित केल्या.

शास्त्रानुसार मूर्तींचे विसर्जन : राजेश धेंपे

या प्रकरणात देवस्थान समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा हात नसून हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. देवतांचा प्रसाद आणि शास्त्रानुसार या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. सध्या हे प्रकरण देवस्थान प्रशासकांकडे न्यायप्रविष्ट असल्याने देवस्थान समितीचे अध्यक्ष या नात्याने प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत बोलू शकत नाही. त्यामुळे फोनवरच प्रतिक्रिया देत असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेश धेंपे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: पर्यटनमंत्री 'चिखल काला' उत्सवात रंगले; म्हणाले "हाच समुद्रापलीकडचा गोवा"

Online Fraud: बक्कळ पैसा मिळेल... तो आमिषाला भूलला अन् 2.5 कोटी गमावून बसला; महाराष्ट्रातून एकाला अटक

Bilawal Bhutto: हाफिज सईद अन् मसूद अझहरला भारताकडे सोपवण्यास पाकिस्तान तयार? का बदलला बिलावल भुट्टोंचा सूर? वाचा

MS Dhoni: साक्षीला 'या' ठिकाणी लपून-छपून भेटत होता धोनी; औरंगाबादमध्ये खुलली कॅप्टन कूलची प्रेमकहाणी

Viral: 'Will You Marry Me?' म्हणताच... पाय घसरला अन् धबधब्यात वाहून गेला तरुण, प्रेयसीची आरडाओरडा; पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT