Sanquelim Temple Theft Dainik Gomantak
गोवा

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Sanquelim Temple Theft: दत्त मंदिरातील मूर्तीचोरी प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे, मुखत्यार श्याम बोडके यांच्‍यासह सदस्‍यांनी नेमके काय घडले याचा तपशील देत प्रशासन चुकल्‍याचे म्‍हटले आहे.

Sameer Panditrao

साखळी: येथील श्री दत्त मंदिरातील मूर्तीचोरी प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे, मुखत्यार श्याम बोडके यांच्‍यासह सदस्‍यांनी नेमके काय घडले याचा तपशील देत प्रशासन चुकल्‍याचे म्‍हटले आहे. या प्रकरणी मामलेदारांविरोधात संबंधित अधिकारणीकडे तक्रार दाखल करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बोडके यांनी म्‍हटले आहे, शुक्रवार २७ रोजी डिचोली मामलेदारांनी सकाळी ११ वा. नोटीस बजावून संध्याकाळी ४ वा. हजर राहण्याची सूचना केली. पण आपणास शक्य नसल्याने खजिनदार विठ्ठल सामंत हे हजर राहिले. त्याच रात्री डिचोली पोलिस स्थानकात चौघांच्या नावाने तक्रार केली.

शनिवार, २८ रोजी सकाळी आपण कार्यालयात आलो असता आपणास पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक केली. त्यानंतर आपले पूत्र ॲड. शर्मद बोडके व आमचे कायदेशीर सल्लागार ॲड. नेहाल कामत यांनी कायदेशीर व तांत्रिक बाजू सांभाळून व दत्तमहाराजांच्या कृपेने रविवारीच आपणास व दीपेश कामत यांना जामीन मिळाला, असेही श्याम बोडके यांनी सांगितले.

या मूर्ती या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती त्यावेळी जपमंडपात काढून ठेवल्या होत्या. समितीचेच पदाधिकारी या मूर्ती नेऊन विसर्जित करतात याला चोरी कशी म्हणू शकतो, असा सवाल सचिव गजानन भटगावकर यांनी उपस्थित केला.

घरभेदींचेच हे षडयंत्र !

घरचेच भेदी देवस्थानची माहिती बाहेर देत आहेत. दत्तवाडी संस्थानात प्रथमच देवस्थान समितीची निवडणूक हात उंचावून झाली. त्यात त्यांचे संपूर्ण पॅनल पडले होते. मागील समितीने नोंदवहीतील इतिवृतांतही यापूर्वी बदलला आहे. या षडयंत्रात त्यांचाच हात आहे, असा आरोप सल्लागार सदस्य दीपेश कामत यांनी केला.

तक्रारीस पोलिस आदेश कसे म्हणू शकतात?

मामलेदार केवळ देवस्थान प्रकरणावर निर्णय घेऊ शकतात. जरी मामलेदारांनी तक्रार केली तरी पोलिस त्यास आदेश म्हणून कसे काय घेऊ शकतात ? असा सवाल यावेळी कायदा सल्लागार अँड. नेहाल कामत यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT