Sadanand Tanawade Gomantak Digital Team
गोवा

Sanquelim : साखळी रवींद्र भवनात ‘अरंगेत्रम’ उत्साहात

युवा कलाकार दुर्वा शेट्ये, तारिनी प्रभू यांचे उत्कृष्ट सादरीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी : म्हापसा येथील प्रियांका डान्स अकादमीतर्फे अलीकडेच ‘अरंगेत्रम’ या भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षणातले शेवटचे सादरीकरण साखळी रवींद्र भवनमध्ये उत्साहात पार पडले. दुर्वा वासुदेव शेटये आणि तारिनी अश्विन कुमार प्रभू गेली सात वर्षे वरील डान्स अकादमीच्या गुरु प्रियांका राणे यांच्याकडे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत होत्या.

त्यांनी प्रभावीपणे आपली कला पेश केली. दोन्ही नृत्यांगनांनी शास्त्रीय नृत्यप्रकार सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. अरंगेत्रम सादरीकरणांत त्यांनी मध्यंतरापूर्वी पुष्पांजली, अलारीपू, जतीसवरम्, वर्णम हे प्रकार सादर केले. मध्यंतरानंतर रंजनी नटनम अदिनार, मिनाक्षी थाये, तिल्लाना आणि मंगलम् हे प्रकार सादर केले.

शिवाय तारीनो प्रभू हिने ‘ऐनगीरी नंदिनी’ आणि दुर्वा शेटये हिने ''शिवस्तुती'' हे एकेरी प्रकार सादर केले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित होते. सन्माननीय पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री अमिता नायक सलत्री उपस्थित होत्या. दोन्ही मान्यवरांनी

आपल्या भाषणात प्रियांका राणे तसेच दोन्ही नृत्यांगनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या कार्यक्रमास खास आमंत्रित म्हणून मुंबई येथील उद्योजिका माला शुक्ला आणि विजय राणे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला मुंबई येथील वाद्यवृंद उपस्थित होते.

ज्यामध्ये मुंबिना बी, डॉ. सोमीया एन., व्यंकटेश्वरन, शर्मिला राव आणि कुमार कृष्णन यांचा समावेश होता. संतोष चारी यांनी केलेली रंगमंच सजावट अवर्णनीय अशी होती. अश्विनीकुमार प्रभु यांनी आभार प्रदर्शन केले. ऐश्वर्या नायर यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT