BITS Pilani Bomb Threat Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani Bomb Threat: बिट्स पिलानीला पुन्हा मिळाली बॉम्बची धमकी, विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून काढले बाहेर

BITS Pilani: देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालय बिट्स पिलानीच्या कॅम्पसला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sameer Amunekar

सांकवाळ: देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालय बिट्स पिलानीच्या कॅम्पसला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. धमकी मिळताच सुरक्षा अधिकारी तत्काळ सक्रिय झाले असून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅम्पसमधून बाहेर काढण्यात आले आहे. सखोल तपासणीसह संपूर्ण परिसरात सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या असून, पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली आहे.

बिट्स पिलानी कॅम्पस गेल्या काही महिन्यांपासून काही दुःखद प्रसंगांमुळे सतत चर्चेत राहिला आहे. मागील नऊ महिन्यांत अभियांत्रिकी क्षेत्रातील पाच विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कॅम्पस प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या.

बिट्स पिलानी ही एक देशातील नावाजलेली संस्था. यात प्रवेश मिळविण्याकरता जबरदस्त स्पर्धा असते. त्यामुळे या संस्थेत प्रवेश मिळालेले विद्यार्थी हे उच्च दर्जाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात.

बिट्स पिलानीला यापूर्वीही अशा धमक्या मिळाल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज आहे. पोलिस तपास सुरू असून, सध्या धमकी पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. संस्थेच्या सुरक्षेसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला, दिल्लीत धोका दिला, यापुढे सहकार्य नाही; गोव्यातील आप आमदारांनी स्पष्ट केली भूमिका

Asia Cup 2025 Final: पाकिस्तान की बांगलादेश? फायनलमध्ये Team India कोणाशी भिडणार? 41 वर्षांचा इतिहास काय सांगतो? वाचा...

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याची दखल, उपचारांची जबाबदारी सरकार घेणार; आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र आणि गोवा बार कॉन्सिलला दणका, ठोठावला 1 लाखांचा दंड; काय आहे नेमकं प्रकरण?

'माकां कोकणी चालियो.." विवाह फेम अमृता राव बोलते अस्सल कोकणी, सोशल मीडियावर Video Viral; चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT