Sankalp Amonkar Interview
Sankalp Amonkar Interview Dainik Gomantak
गोवा

मतदारसंघाच्या समस्या विधानसभेत मांडून कर्तव्य बजावणार; संकल्प आमोणकरांचे आश्वासन

Kavya Powar

Sankalp Amonkar Interview : 2022 ची विधानसभा निवडणूक आतापर्यंतच्या निवडणुकींमध्ये सर्वात लक्षवेधी निवडणूक ठरली. या निवडणुकीत अनेक घडामोडी घडत होत्या. भाजपने काँग्रेस आणि इतर पक्षांवर मात करत पुन्हा सत्ताधारी होण्याचा मान पटकावला असला तरी काँग्रेसने संपूर्ण कालावधीमध्ये गोवेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

या निवडणुकीत अनेक नवीन आमदार निवडून आले आहेत; त्यापैकीच एक म्हणजे मुरगाव मतदारसंघातून निवडून आलेले संकल्प आमोणकर. यानिमित्ताने गोमंतक टीव्हीसाठी सल्लागार संपादक शैलेंद्र मेहता यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघासाठीचे आपले व्हिजन स्पष्ट केले आहे.

मतदारसंघाच्या समस्या विधानसभेत मांडणार..

सुरुवातीला संकल्प आमोणकर यांनी निवडून आल्याबद्दल मुरगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांचे आभार मानले. विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबाबत त्यांनी आशा व्यक्त करत मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. विधानसभेत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या सर्व आमदारांनी आपले प्रश्न तयार केले असून याबाबत काम करायला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची खेळी

2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप स्वतः निवडून येणार नाही याची त्यांना खात्री असल्यामुळे त्यांनी काँग्रेसची मते फोडायला सुरुवात केली. यामध्ये पक्षाला तोटा असा झाला की, आमचे 10 आमदार पक्ष सोडून गेले आणि याचाच फायदा भाजप आणि इतर पक्षांनी घेतला. त्यांनी इतर लहान पक्षांना सोबत घेऊन आपले सरकार स्थापन केले आहे. मूळत: त्यांच्यामध्ये ही धमकच नाही की ते स्वतःच्या जीवावर निवडून येतील, असे म्हणत आमोणकर यांनी भाजपवर सडेतोड टीका केली.

मुरगाव मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

आमदार म्हणून त्यांना त्यांचे व्हिजन विचारले असता ते म्हणाले की, मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न मुख्य बनला आहे. याआधी दिवसातून एकदाच पाणी येत होते; पण आता दिवसातून तीन वेळा पाणी येत आहे. पण तरीही पूर्णवेळ नागरिकांना पाणी मिळावे यासाठी माझे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.

मतदारसंघांमध्ये स्वतंत्र हॉस्पिटल असण्याची गरज आहे. नागरिकांना हॉस्पिटल नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मतदारसंघातील नागरिकांना उपचारासाठी 10 किलोमीटर लांब चिखलीत दवाखान्यात जावे लागते. पण तिथे सुद्धा अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळे तिथून नागरिकांना पुन्हा बांबोळीमध्ये जावे लागत आहे. अनेकदा गैरसोय झाल्यामुळे किंवा उपचार मिळण्यासाठी उशीर झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मतदारसंघांमध्ये लवकरात लवकर स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याची मी प्रयत्न मी करत आहे, असे ते म्हणाले.

अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोळसा प्रदूषण. सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा प्रकल्प गोवा सरकारतर्फे राबविण्यात येत आहे यामध्ये कोळसा साठवणूक करण्यात येत असून यामुळे मतदारसंघातील लोकांना विविध आजार होण्याची शक्यता आहे. अस्थमा, कॅन्सर आणि श्वास घेण्यास त्रास अशा अनेक गोष्टी नागरिक सहन करत आहेत. खरंतर या कोळसा साठवणुकीवर सरकारने ठोस यंत्रणा राबवली पाहिजे. यासाठी विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.

तीन रेषीय प्रकल्पांचा गोवेकरांना काडीमात्रही फायदा नाही!

गोवा सरकार तीन रेषीय प्रकल्प राबविण्यावर भर देत आहे; मात्र याचा गोवेकरांना काहीच फायदा होणार नाही. वीज वाहतुकीसाठी तामणारप्रकल्प, रेल्वे दुपदरीकरण आणि पणजी- बेळगाव राष्ट्रीय महामार्ग या तिन्ही प्रकल्पांमुळे गोव्यातील जैवविविधता आणि वन्यजीवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. त्याचबरोबर या भागामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या विस्थापनाचा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. या सर्व प्रकल्पांना गोवेकरांचा विरोध असूनही भाजप सरकार आपला हट्टीपणा सोडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. रेल्वे दुपदरीकरणामुळे खरतर खूप मोठ्या प्रमाणात वन्यजीव आणि झाडांची नासाडी होणार आहे. जर हा प्रकल्प लोकांच्या फायद्यासाठी असता तर एक वेळ मान्य करता आला असता; पण रेल्वे दुपदरीकरण प्रवाशांच्या सोयीसाठी न करता केवळ कोळसा वाहतूकीसाठी करण्यात येत आहे. कारण मोठ्या व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे; आणि या व्यावसायिकांना गोवा सरकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदतच करत आहे.

(सविस्तर मुलाखत पहा फक्त गोमंतक टीव्हीवर)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT