CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात पावसााने थैमान घातले असताना मुख्यमंत्री...', संकल्प अमोणकरांचा हल्लाबोल

संपूर्ण गोव्यात पावसाने थैमान घातले असून जनता हवालदिल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: संपूर्ण गोव्यात पावसाने थैमान घातले असून जनता हवालदिल झाले आहेत. परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवार दि. 6 जुलै रोजी एका स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन होऊन शतकपूर्ती झाली आहे. सरकारची शतकपूर्ती करण्यसाठी मुख्यमंत्र्यांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. दुसरीकडे मात्र, राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी या स्नेहमेळाव्यावरुन भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेसचे विधीमंडळ गट नेते आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सावंत सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, भाजप (BJP) सरकारची शतकपूर्ती निमीत्त मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मला सदर स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. यामधून भाजप सरकार किती असंवेदनशीलपणाने वागत आहे हे दिसून येते, असे आमदार अमोणकर यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, संपूर्ण गोवा आज या अस्मानी संकटाचा सामना करत आहे. लोक बेघर झाले आहेत. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी खरंतर लोकांना मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे होते. दुर्देवाने मुख्यमंत्री स्नेहमेळाव्याचे आयोजन करुन उत्सव साजरे करण्यात धन्यता मानत आहेत, अशी बोचरी टिका संकल्प आमोणकर यांनी केली.

शिवाय, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सदर स्नेहमेळाव्याचे आयोजन रद्द करावे. सरकारी तिजोरीतून जनतेचा पैसा वायफळ खर्च करण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही. सरकारने (Government) खर्च कपात करुन जनतेला मदत करणे गरजेचे आहे, असेही संकल्प आमोणकर यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT