Sankalp Amonkar Dainik Gomantak
गोवा

Sankalp Amonkar: 'उमेदवारीसाठी दिनेश राव अन् के. सी. वेणुगोपाल यांनी कोट्यवधी रुपये कमावले'

12 मतदारसंघातील उमेदवारांकडून ही या दोघांनी पैसे उकळले

Sumit Tambekar

गोव्यातील आठ काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केला असून राज्यात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यावरुन आता भाजपात प्रवेश केलेल्या आमदार संकल्प आमोणकरांनी ही काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाची उमेदवारी देताना आपल्याकडून पैसे उकळल्याचे ते म्हणाले.

(Sankalp Amonkar alleges Dinesh Rao and KC Venugopal earned crores of rupees for Congress Assembly candidature)

यावेळी बोलताना आमोणकर म्हणाले की, माझ्यासोबत काँग्रेसच्या इतर 12 मतदारसंघाच्या उमेदवारांकडून काँग्रेसच्या वरिष्ट नेत्यांनी पैसे उकळले आहेत. यामध्ये दिनेश राव आणि के. सी. वेणुगोपाल यांनी हे पैसे उकळले असल्याचा आरोप केला आहे.

आमोणकर पुढे म्हणाले की, या दोघांनी यातून कोट्यावधी रुपयांची लूट केली आहे. आमोणकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रसेबाबत आपली दुखरी बाजू बोलून दाखवली आहे. त्यामूळे आणखी काय सल बोलून दाखवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या आमदारांनी ठोकाला काँग्रेस रामराम

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि पक्षाचे इतर नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.या 8 आमदारांमध्ये मायकेल लोबो, दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, दिलायला लोबो यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT