Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory:...तर ऊस उत्पादक व कामगारांचा प्रश्न कायमचा सुटणार, सरकारने फसवणूक करु नये; राजेंद्र देसाई

Sanjivani Sugar Factory: सरकार कारखान्याबाबत स्पष्ट धोरण काय ते सांगत नाही, त्यामुळे उस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत, असे देसाई म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivani Sugar Factory

फोंडा: सरकारने ऊस उत्पादकांची फसवणूक करू नये. कारखाना सुरू करण्याची हमी वारंवार सरकारने दिली. इथेनॉल प्रकल्प सुरु करण्यासाठी एका कंपनीने दिलेला प्रस्ताव अजून मंजूर केलेला नाही. इथेनॉल प्रकल्प सुरु झाल्यास ऊस उत्पादक व कामगारांचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

तसेच त्या कंपनीकडून सरकारला दरवर्षी १ कोटी २५ लाख भाडे मिळणार आहे. त्यामुळे सरकारने कारखाना सुरू करण्याबद्धल धोरण जाहीर करावे, असे ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने पाच वर्षाच्या कालावधीसाठी विशेष योजना सुरू केली होती. यंदा शेवटचे वर्ष आहे, जो पर्यंत कारखाना सुरू होत नाही तो पर्यंत सरकारने ऊस उत्पादकसाठी विशेष योजना सुरूच ठेवावी तसेच कारखान्याबाबतही सरकारने स्पष्ट धोरण काय आहे, ते ऊस उत्पादक शेतकऱ्याना सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली.

देसाई म्हणाले की, सरकार कारखान्याबाबत स्पष्ट धोरण काय ते सांगत नाही, त्यामुळे उस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

मुख्यमंत्र्यांना भेटणार !

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षासाठी विशेष योजना राबवून आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल आम्ही गोव्यातील ऊस उत्पादक सर्व शेतकरी सरकारचे आभार मानतो. तसेच कारखाना परत सुरू होईपर्यंत आम्हाला या पुढेही विशेष योजना राबवून अर्थ साहाय्य चालू ठेवावे, या संदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची लवकरच भेट घेऊन आम्ही निवेदन देणार आहोत, असे राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT