Sanjivani Sugar Factory Salary Delay Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Sanjivani Sugar Factory Salary Delay: दयानंदनगर-धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वित्त खात्यात मंजुरीअभावी फाईल प्रलंबित राहिल्यामुळे गेल्या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: दयानंदनगर-धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वित्त खात्यात मंजुरीअभावी फाईल प्रलंबित राहिल्यामुळे गेल्या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. आता तिसरा महिना संपत आला तरी वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.

सरकारदरबारी आर्थिक मंजुरी मिळाली नसल्याने दोन महिन्यांचे वेतन थकले असून, त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीतील आर्थिक मंजुरीसाठीची फाईल वित्त खात्याकडे पाठविण्यात आली आहे.

मात्र, अद्याप मंजुरी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. हातात पैसे नसल्याने या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने मुलांची फी, शालेय साहित्याचा खर्च, कर्जाचे हप्ते तसेच दैनंदिन गरजांसाठी लागणारा निधी उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

सरकार खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची घोषणा करीत आहे. मात्र, गेल्या १२ वर्षांत संजीवनी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच इतर लाभांपासूनही हे कर्मचारी वंचित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आपल्या भवितव्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने लक्ष घालून वित्त खात्याकडील मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT