Sanjit Rodrigues IAS | smart city panaji Dainik Gomantak
गोवा

आता तुम्ही सांभाळा! स्मार्ट सिटीच्या विळख्यातून पणजीला वाचवण्यासाठी संजीत रॉड्रिग्स यांना पाचारण

स्मार्ट सिटी कामाचा एक धड भारभर चिंध्या या अवस्थेला सावरण्यासाठी पालिकेचे एकेकाळी आयुक्त राहिलेले संजीत रॉड्रिग्स यांना पाचारण करण्यात आले आहे.

Pramod Yadav

smart city panaji: पणजीत मागील अनेक दिवसांपासून इमेजिन पणजीच्या अंतर्गत स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. विकासकामांसाठी शहरात विविध ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप कामे पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात पणजी बुडल्यास जबाबदारी कोणाची असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, स्मार्ट सिटी कामाचा एक धड भारभर चिंध्या या अवस्थेला सावरण्यासाठी पालिकेचे एकेकाळी आयुक्त राहिलेले संजीत रॉड्रिग्स (Sanjit Rodrigues IAS) यांना पाचारण करण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीच्या विळख्यातून पणजीला वाचवण्यासाठी संजीत रॉड्रिग्स यांना पाचारण आले असून, कार्मिक खात्याकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. इमेजिन पणजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी रॉड्रिग्स यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

रॉड्रिग्स पणजी महापालिकेचे ते आयुक्त राहिले आहेत. त्यामुळे शहराची त्यांना संपूर्ण माहिती आहे. तात्काळ प्रभावाने त्यांच्याकडे ही सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

दरम्यान, संजीत रॉड्रिग्स यांनी याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. रॉड्रिग्स यांच्यावर शहरातील स्मार्ट सिटीच्या कामामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरात पाणी साचणे, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांवर तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा पावसामुळे होणाऱ्या अडचणींचा समाना पणजीकरांना करावा लागणार यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT