BJP  Dainik Gomantak
गोवा

संजीव नाईक: सामान्य कार्यकर्ता ते उपमहापौर

संघर्ष: बाबूश मोन्सेरात आणि भाजपने घेतली कार्याची दखल

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या दोन दशकहून अधिक काळ भाजपचा कट्टर कार्यकर्ता असलेले संजीव नाईक यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पक्ष कार्यासाठी वाहून घेतलेल्या नाईक यांची दखल अखेर पक्षाने घेतली आणि त्यांना पणजीच्या उपमहापौरपदाचा मान मिळाला.

नाईक यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले की, कॉलेज पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाचा व्यवसाय चालवला. भाजपचे जुने कार्यालय ज्या इमारतीत होते, तेथेच माझे दुकान होते. त्यामुळे येता-जाता मनोहर पर्रीकर ऊर्फ भाई यांच्याशी परिचय वाढत गेला. त्यानंतर मी भाजपचे कार्य करण्याचे ठरविले.

पर्रीकर हे पणजीचे आमदार असल्याने पक्षकार्य करताना प्रोत्साहन मिळायचे. त्यामुळे नवचैतन्य व ऊर्जा निर्माण होऊन मी राजकारणात झोकून दिले. 2000 सालापासून मी भाजपचा कार्यकर्ता असून पणजी भाजप प्रभाग अध्यक्ष होतो. भाजप मंडळामध्येही होतो. पणजी मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला, त्यातच येथील उमेदवार मनोहर भाई असल्याने पक्षाचे काम करण्यास उमेद वाटायची. पक्षाने सोपविलेले काम प्रामाणिकपणे केले, त्यामुळेच आज मी पदापर्यंत पोहचलो. या पदाची मी कोणाकडेही मागणी केली नव्हती. पणजीचे आमदार तथा मंत्री मोन्सेरात यांनी स्वतःहून या पदासाठी माझी निवड केली, असे नाईक म्हणाले.

पक्षनिष्ठेचे फळ मिळाले

2021 च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी तसेच आमदार बाबूश मोन्सेरात यांनी प्रभाग 25 मधून निवडणूक लढवण्यास माझे नाव निश्‍चित केले. पक्षाशी एकनिष्ठ राहून दिलेले कार्य करत राहिल्यास फळ निश्‍चितच मिळते, हे माझी उपमहापौरपदी झालेली निवड यावरून दिसते. भाजपमध्ये एकनिष्ठ कार्यकर्त्यांची दखल घेतली जाते, याचा अनुभव अनेकांना आला आहे. उपमहापौर पदावर असलो तरी माझी काम करण्याची पद्धत पूर्वीचीच राहणार आहे. लोकांच्या समस्या तसेच त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT