Sanjeel Kudchadkar Kidnapping Case Dainik Gomantak
गोवा

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: "चलत्या गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न!" संजील कुडचडकरची धक्कादायक जबानी; पत्नी लुईझा अद्याप बेपत्ताच

Sanjeel Kudchadkar Abduction Margao Goa: कोंब-मडगाव येथून दिवसाढवळ्या अपहरण केलेल्‍या संजील कुडचडकर याला संशयितांनी गाडीत कोंबून कारवारच्‍या दिशेने नेताना वाटेत गळा आवळण्‍याचाही प्रयत्‍न केला हाेता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: कोंब-मडगाव येथून दिवसाढवळ्या अपहरण केलेल्‍या संजील कुडचडकर याला संशयितांनी गाडीत कोंबून कारवारच्‍या दिशेने नेताना वाटेत गळा आवळण्‍याचाही प्रयत्‍न केला हाेता, अशी जबानी संजीलने मडगाव पोलिसांना दिल्‍याने या प्रकरणात संशयितांच्‍या विरोधात भारतीय न्‍याय संहितेच्‍या १०४ (१) (खुनाच्‍या उद्देशाने केलेले अपहरण) हा नवीन गुन्‍हा नोंद केला आहे. या प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार असलेली संजीलची पत्‍नी लुईझा ही अद्याप बेपत्ता असल्‍याने हे अपहरण नेमके कोणत्‍या कारणामुळे झाले, हे अजूनही गुलदस्‍त्‍यात आहे.

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी नासीर बिन मसूद आणि शहा अली सौदागर या दोघांना अटक केली असून सध्‍या ते पोलिस कोठडीत आहेत. अपहरणादरम्‍यान संशयितांनी संजीलकडून एका कागदपत्रावर सही घेण्‍याचाही प्रयत्‍न केला होता. कारवार येथे काही कारणास्‍तव संशयितांनी गाडी थांबवली असता, तीच संधी साधून संजीलने गाडीतून पलायन करीत जीव वाचवला, अशीही माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे मडगावचे (Margao) पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांना विचारले असता, तिन्‍ही संशयितांच्‍या विरोधात यापूर्वी अपहरणाचा गुन्‍हा नोंद झाला होता. काल आम्‍ही १०४ (१) खाली नवीन गुन्‍हा नोंद केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सध्‍या लुईझाचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, कारवार येथील एका इस्‍पितळात लुईझा भरती झाली असून तिथे तिच्‍यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप मडगाव पोलिसांकडून या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.

मागील शुक्रवारी ही घटना घडली हाेती. ही अपहरणाची कृती सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यावर चित्रित होऊन नंतर हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍याने सगळीकडे तो चर्चेचा विषय बनला होता. माझ्या वडिलांचे आईनेच अपहरण केल्‍याची तक्रार संजीलच्‍या मुलीने पोलिसांत दिली होती.

मिळालेल्‍या माहितीनुसार, संजील व लुईझा हे दोघांचे २२ वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्‍न झाले होते. मात्र, मागील काही वर्षांत त्‍यांच्‍यातील संबंध तणावपूर्ण होऊन त्‍यांनी एकमेकांपासून विभक्‍त होण्‍याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीही आणखी एकदा लुईझाने संजीलचे अशाच प्रकारे अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यावेळी कुटुंबीयांनी मध्‍यस्‍थी केल्याने हे प्रकरण सामोपचाराने मिटविले होते.

रेकीनंतर अपहरणाचे नियोजन

लुईझा हिने मसूद आणि सौदागर या दोघांच्‍या मदतीने संजीलचे अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न केला. ते दोघेही लुईझाच्‍या मालकीच्‍या कुडतरी येथील घरात भाड्याने राहात होते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. हे अपहरण करण्‍यापूर्वी लुईझाने काही दिवस संजीलच्‍या हालचालींवर पाळत ठेवली असावी, असा संशय पोलिस व्‍यक्‍त करत आहेत.

तीन दिवसांपूर्वीच लावले होते कॅमेरे

ज्‍या जागेवरून संजीलचे अपहरण केले, त्‍या ठिकाणी पूर्वी सीसीटीव्‍ही कॅमेरे नव्‍हते. याची माहिती असल्‍यामुळे त्‍याच जागेवरून संजीलचे अपहरण केले. मात्र, संशयितांच्‍या दुर्दैवाने म्‍हणा किंवा संजीलच्‍या सुदैवाने, अपहरणाच्‍या घटनेच्‍या तीन दिवसांआधीच त्‍या ठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविले होते. त्यामुळेच ही घटना कॅमेऱ्यांत कैद झाली आणि पाेलिसांना पुरावा मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT