Sanjay Raut  Dainik Gomantak
गोवा

भाजपमधील घराणेशाहीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दैनिक गोमन्तक

पणजी: शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी अखेर जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेनेच्या पहिल्या यादीत 9 उमेदवारांचा समावेश आहे. (Sanjay Raut Shiv Sena Goa Election 2022)

उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या उमेदवारीवरून भाजपला खडे बोल सुनावले आणि भाजपच्या तिकीट वाटपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. भाजपने घराणेशाहीच्या नावाखाली उत्पल पर्रीकर यांचे तिकीट कापले, मात्र वाळपई, पर्ये, पणजीत (Panaji), ताळगावमध्ये घराणेशाहीलाच वाव दिला, असे देखील ते म्हणाले.

पणजीमधून बाबूश मोन्सेरात तर ताळगावमधून त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात निवडणूक लढवणार आहेत. याच बरोबर वाळपईतून विश्वजीत प्रतापसिंग राणे आणि पर्येतून दिव्या विश्वजीत राणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. संजय राऊत म्हणाले, "उत्पल पर्रीकर यांच्या विषयात मी खूप काही वाचले आहे. त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवली तर शिवसेना आपला उमेदवार मागे घेईल."

दरम्यान राऊत यांनी लोकांना भाजपची (BJP) सत्ता उलथवून लावण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "गोवा राज्य राजकीय घराण्यामधील मूठभर माणसांच्या हातात आहे. येथे सर्वसामान्य माणसाला काहीही मिळत नाही. या प्रस्थापितांना घरी बसवण्यासाठी व आलेमाव गेलेमाव संस्कृती संपवण्यासाठी आम्ही सर्वसामान्य चेहऱ्यांना संधी देत आहोत."

शिवसेना उद्या दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्पल पर्रीकर राऊत यांच्या ऑफरला उत्तर देतात का हे आगामी काळात कळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT