Sanjay Raut on goa election results | Sanjay Raut News Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या निकालावर संजय राऊतांचं मोठं विधान

पक्ष राज्याबाहेर जाताना पहिल्यांदा संघर्ष करावाच लागतो आणि..

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये पंजाब वगळता, भाजपने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. गोव्यातही (goa) भाजप सरकार स्थापन करणार आहे. तर गोवा आणि उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरले होते. त्यांचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. अशा परिस्थितीत या विजयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची लढा अजून संपलेला नाही अशा प्रतिक्रिया आली आहे.

भाजपच्या (BJP) विजयावर संजय राऊत (Sanjay Raut) गुरुवारी म्हणाले, 'जो जिंकतो, त्याचे अभिनंदन करण्याची आपल्या देशात परंपरा आहे, त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा पंजाबमध्येही पराभव झाला, आम्ही एकत्र लढलो असतो तर गोव्यात चांगली कामगिरी करता आली असती.(Sanjay Raut on Goa election results)

संजय राऊत पुढे म्हणाले, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे दिल्लीतील काम पाहून लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त ठेवला आहे. काँग्रेस मोठा पक्ष असूनही पंजाब (Punjab) हातातून गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशातही काही करता आले नाही. आपण सर्वांनी मिळून निवडणूक (Election) लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता अस म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच आम्ही खूप चांगलं काम केलं होतं. ही आमच्या पक्षाची महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची सुरुवात आहे. कोणताही प्रमुख पक्ष राज्याबाहेर जाताना पहिल्यांदा संघर्ष करावाच लागतो. ही आम्ही पक्ष बाहेर नेण्याची सुरुवात केली आहे. आम्ही थांबणार नाही”, असा निर्धार यावेळी राऊतांनी बोलून दाखवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT