गोव्यातील केपे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आल्टन डिकॉस्टा यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचा पराभव केला आहे. आल्टन डिकॉस्टा यांनी केपे जागेवर 3601 मतांनी विजय मिळवला आहे. केपे विधानसभा मतदारसंघ (Quepem Vidhan sabha seat) दक्षिण गोवा जिल्ह्यात येतो. हा गोवा विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. केपे येथे 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि 10 मार्च रोजी निकाल जाहीर झाला. 2017 मध्ये, केपे विधानसभा (Assembly) जागेवर 31,293 मतदान झाले होते. यामध्ये 15,478 पुरुष तर 15,815 महिला मतदार आहेत. NOTA ला 1.1 टक्के मते मिळाली.
या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व असून काँग्रेसने येथून 7 वेळा विजय मिळवला आहे. 2017 च्या निवडणुकीत चंद्रकांत कवळेकर काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रकाश वेळीप यांचा पराभव केला. 2019 मध्ये चंद्रकांत कवळेकर (Babu Kavalekar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते सामील होताच गोव्याचे (goa) उपमुख्यमंत्री बनले. यावेळी भाजपकडून चंद्रकांत कवळेकर आणि काँग्रेसचे आल्टन डिकॉस्टा रिंगणात होते.
कोण आहेत चंद्रकांत कवळेकर
चंद्रकांत कवळेकर (जन्म 7 मे 1971), हे चंद्रकांत 'बाबू' म्हणून ओळखले जातात, हे गोव्यातील एक प्रसिद्ध राजकारणी (Politics) आणि मंत्री आहेत. ते गोवा विधानसभेचे चारवेळा सदस्य आहेत. ते केपे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. विधानसभा निवडणुकीत बाबू कवळेकर यांनी भाजपचे उमेदवार प्रकाश वेळीप यांच्यावर विजय मिळवला आणि सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 11 जुलै 2019 रोजी त्यांनी काँग्रेस (Congress) सोडली आणि भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. 13 जुलै 2019 रोजी त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.