Water Shortage  Dainik Gomantak
गोवा

Sanguem: पाण्याची तीव्र टंचाई; नागरिकांंमध्ये उसळली संतापाची लाट

Sanguem: सांगेत गेले तीन दिवस पाणी नसल्याने प्रशासनाचे दुर्लक्ष काय असते, हे जनता अनुभवत आहे.

दैनिक गोमन्तक

Sanguem: सांगेत गेले तीन दिवस पाणी पाणी करण्याचा प्रसंग नागरिकांवर ओढवला असून पाणी खात्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. परिणाम म्हणून नागरिक पाणी खात्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करू लागले असून अशी मोठी दुरुस्ती करायची असल्यास ग्राहकांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया फोणकुली-कष्टी येथील धीरज हरमलकर यांनी व्यक्त केली आहे.

मोठ्या जलवाहिनीचे दुरुस्ती काम कोटार्ली-सांगे येथे सुरू होते. त्या दिवशी दिवसभर नळ कोरडे पडले. दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती होती. वास्तविक पाणी खात्याने नागरिकांना आगाऊ कल्पना देणे आवश्यक होते. नसल्यास पाणीपुरवठा करणारे टँकर गावात फिरविणे गरजेचे होते. प्रशासन नावाची गोष्टच नसल्याची परिस्थिती गेले तीन दिवस सांगेतील जनता अनुभवीत होती, अशी प्रतिक्रिया ऑलीवर फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

नगरसेवक मेशू डिकॉस्ता म्हणाले की, जलवाहिनी दुरस्ती कार्य हाती घेणार असल्याची ग्राहकांना कल्पना देणे गरजेचे होते आणि वेळीच जलवाहिनी दुरुस्ती झाली नसल्यास पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी पाणी खात्याची असताना तीन दिवस प्रशासन कोलमडले. अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद; मग सामान्य जनतेला आमच्यासारख्या नगरसेवकांनी काय उत्तर द्यावे. दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT