IIT News  Dainik Gomantak
गोवा

Goa IIT: सांगे, केपे,कोटार्लीतील शेतकऱ्यांचा IIT प्रकल्पाला विरोध कायम

सांगे, केपे, कोटार्ली येथील नागरिकांनी जोरदार निदर्शने

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस सांगे येथील आयआयटी प्रकल्पाबाबत आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यावरुन आज सांगे, केपे, कोटार्ली येथील नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. ह्या जमीनी आमच्या पुर्वजांचा ठेवा असून तो आमच्याकडेच राहीला पाहिजे असे या शेतकऱ्यांचे मत आहे.

( Sanguem Quepem cortalim farmers opposes to IIT Sanguem Project )

पणजी येथील आझाद मैदानात सांगे, केपे, कोटार्ली येथील शेतकऱ्यांनी आज जोरदार निदर्शने केली. आमच्या शेत जमिनीतील उत्पादने जेमतेम आहेत. सांगे आणि परिसरातील नागरिक आपले पोट या शेतात कष्ट करुन भरतात. असे असताना काही लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करत येथे आयआयटी सारखा प्रकल्प उभारून आमच्या जमीनी लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. याला आमचा विरोध असून आमच्या जमीनी आमच्याकडेच राहूदेत असे ही ते म्हणाले.

या जमीनींमध्ये काजू, माडाची शेती आहे. या जमीनी म्हणजे आमच्या पुर्वजांचा ठेवा, आम्ही तो जपून ठेवणार आहे. आमदार सुभाष फळदेसाई यांना माहित असून ही ते या ठीकाणी आयआयटी सारखा प्रकल्प आणत आहेत ज्याला आमचा तीव्र विरोध आहे.

फळदेसाई यांनी आता काही शेतकऱ्यांना धमक्या देत विरोध मोडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एक लोकप्रतिनिधी लोकांवर दादागिरी कसा करु शकतो. यातून फळदेसाई यांना असे काय मिळणार आहे. ज्याच्यामूळे लोकांचा विरोध असताना ही ते यावर ठाम आहेत? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी विचारला.

काहीही झालं तरी आयआयटी प्रकल्प सांगेतच होणार - आमदार फळदेसाई

शेतकऱ्यांचा विरोध असताना काहीही झालं तरी आयआयटी प्रकल्प सांगेतच होणार असे सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले की, आयआयटी प्रकरणात काहीजणांकडून स्थानिकांची दिशाभूल केली जात आहे. पण स्थानिकांना विश्वासात घेत सांगेतच आयआयटी प्रकल्प करणार आहे. स्थानिकांनी भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहनही सुभाष शिरोडकर यांनी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT