Goa Tourist Places: कोरोना काळात कच खाल्लेला पर्यटन व्यवसाय; नव्याने फुलण्याची शक्यता!

Goa Tourist Places: यंदा संपूर्ण गोव्यासाठी 360 शॅक्स मंजूर करण्यात आले आहेत.
Goa Tourism | Goa Beach
Goa Tourism | Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourist Places: कोरोना काळात कच खाल्लेला पर्यटन व्यवसाय आता यंदाच्या हंगामात नव्याने फुलण्याची शक्यता आहे. यंदा संपूर्ण गोव्यासाठी 360 शॅक्स मंजूर करण्यात आले आहेत. वार्षिक फीसुद्धा वाढविण्यात आली आहे. परवान्यासाठी अ आणि ब अशी दोन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे.

अ श्रेणीत प्रत्येकी 1 लाख 35 हजार 500 रुपये वार्षिक फी, तर ब श्रेणीत 1 लाख 10 हजार फी ठरविण्यात आली आहे. प्रत्येकाला 20 खाटा ठेवण्यास मान्यता असेल. त्यासाठी 25 हजार फी भरावी लागणार आहे. याव्यतिरिक्त 57 जाचक अटी पाळाव्या लागणार आहेत, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिली.

Goa Tourism | Goa Beach
Fifa World Cup 2022 : कतारमध्ये स्थायिक गोमंतकीय मुलीचं फिफासाठी खास थीम साँग

मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट येथे सर्वात जास्त म्हणजे 108 शॅक असतील. त्यात सावतावाडो येथे 25, गौरावाडो 22, खोब्रावाडो 17, उमटावाडो 16, माड्डावाडो 11, तिवयवाडो 17अशी विभागणी करण्यात आली आहे. कांदोळी येथे 88 शॅक असतील. त्यात शिमेर 12, ईस्किराव वाडो 10, कामतीवाडो 19, मुरूड 12, वाडी 26, दांडो 9, असा समावेश आहे.

उत्तर गोव्यात ब श्रेणीमध्ये हरमल 12, मांद्रे 10, मोरजी 11, वझरांत 8, हणजुणे 7, वागातोर 1, शिरदांव 2व शापोरा 2मिळून 62 शॅक्सचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात अ श्रेणीत 65 शॅक आहेत. त्यात माजोर्डा 10, कोलवा 8, कोलमार 1, बाणावली 12, कालावाडो 3, वार्का 4, फात्राडे 7, मोबोर-केळशी 6, कांडीवाडा-केळशी 11, असा समावेश आहे.

Goa Tourism | Goa Beach
Panaji Accident: पणजीत भरधाव टेम्पो विजेच्या खांबाला धडकला

दक्षिण गोव्यात ब श्रेणीत एकूण 40 शॅक आहेत त्यात वेळसांव 2, आरोसी 4, उतोर्डा 7, थंडवाडा-बेताळभाटी 7, रानवाडो-बेताळभाटी 2, सनसेट-बेताळभाटी 1, गोन्सुवा 2, सेर्नाभाटी 3, वेळुडा बाणावली 4, झालोर 4, बायणा 2, बोगमाळो 2, असा समावेश आहे.

चालकांसाठी अशा आहेत अटी...

शॅक चालविण्यासाठी 57 जाचक अटी आहेत. शॅक भाड्याने देता येणार नाही. सापडल्यास 10 लाख रुपये दंड, 14 वर्षांखालील मुलांना व विदेशी नागरिकांना कामावर ठेवता येणार नाही. शॅकचा आकार 18 मीटर बाय 8 मीटर असेल. प्रत्येक शॅक ठरल्या जागीच असावा लागेल. तपासणीसाठी जिओटॅग लावावा लागेल. खाद्यपदार्थ, शितपेय दरफलकावर लावावे लागतील. प्रत्येकाला बिल द्यावे लागेल.

Goa Tourism | Goa Beach
Mormugao Municipality: योगिता पार्सेकरच्या तर्फे अंगणवाडीतील 85 मुलांना फळांचे वाटप

दर वाढविल्याची तक्रार आल्यास परवाना रद्द केला जाणार. उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास दंड व परवाना रद्द करून 3 वर्षे काळ्या यादीत टाकण्यात येणार. 50 हजार अनामत रक्कमही जप्त केली जाणार. दुमजली शॅक बांधता येणार नाहीत. हंगाम संपताच 10 जूनपर्यंत ते पाडले पाहिजेत. सांडपाणी निचरा त्याच ठिकाणी करता येणार नाही. कचरा गोळा करणाऱ्या एजन्सीला 10 हजार रुपये द्यावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com