Sanguem Police Station  Dainik Gomantak
गोवा

Sanguem Police Station: ताडपत्रीच्या भरवश्यावर पोलिस स्थानक; उद्धाराच्या प्रतीक्षेत

Sanguem Police Station Old Building: सांगे पोलिस स्थानक सर्वांत जुन्या व जीर्ण वास्तूत सुरू आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे पोलिस स्थानक हे राज्‍यातील एका सर्वांत जुन्या व जीर्ण वास्तूत आजही सुरू आहे. पावसाळ्‍यात तेथे गळती लागते. त्‍यामुळे सध्‍या या इमारतीच्‍या छपरावर प्लास्टिकचे आच्‍छादन घालण्यात आले आहे.

तेथे नवीन इमारत बांधण्‍यात येणार असे कित्‍येक वर्षांपासून सांगण्‍यात येत असले तरी अद्याप कोणतीही हालचाल दिसून येत नाही. या पोलिस स्थानकात पोलिस कोठडी, आर्मरूम, कार्यालय, पोलिस कर्मचाऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी दाटीवाटीने निर्माण केलेली खोली, महिला कर्मचाऱ्यांसाठी खोली, भोजन तयार करण्यासाठी खोली, वायरलेस कक्ष हे सर्व कसेबसे सजविण्यात आले आहे.

प्रशस्त अशी मोकळी जागा कुठेच दिसून येत नाही. उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नाही. या वास्तूच्या ठिकाणी नवीन वास्तू उभी केल्यास बऱ्याच त्रुटी भरून काढता येणे शक्य आहे. वायरलेस कक्ष, वाहतूक पोलिस, सीआयडी कक्ष, कँटीन, लोकांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष, कर्मचारी निवास अशा अनेक गोष्टी करता येणे शक्य आहे. पण नव्या वास्तूला अगोदर मुहूर्त मिळणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT