Sanguem Dainik Gomantak
गोवा

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Subhash Phaldesai: गावकर कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीनंतर सरपंच चंद्रकांत गावकर यांनी पुढाकार घेतला आणि या जागेचे मालक शशिकांत वेळीप यांच्याशी चर्चा केली.

Sameer Panditrao

केपे: चार महिन्यांपूर्वी विलीयण-सांगे येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने गरिबीत दिवस कंठणाऱ्या माय-लेकीचे झोपडीवजा घर आगीत भस्मसात झाले होते. या माय-लेकींची हालाखीची स्थिती पाहून सांगेचे आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या सहकार्याने त्यांना घर बांधून दिले. दसऱ्यादिवशी फळदेसाई यांनी घराच्या चाव्या श्रीमती रोहिदास गावकर आणि त्यांची कन्या तेजा यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर गृहप्रवेश करण्यात आला.

चार महिन्यांपूर्वी विलीयण-सांगे येथील श्रीमती गावकर यांचे घर सिलिंडर स्फोटात उदध्वस्त झाले होते. सुदैवाने या घटनेवेळी श्रीमती आणि त्यांची मुलगी तेजा या दोघीही शेजारील घरात झोपायला गेल्या होत्या. त्यामुळे त्या दोघी बचावल्या.

घरात कमविणारे कोणीच नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची आहे. या आगीत त्यांचे सर्व साहित्य भस्मसात झाले होते. त्यात त्यांची ओळखपत्रे, कपडे आणि भांड्यांचाही समावेश होता. गावकर कुटुंबाची स्थिती पाहून मंत्री फळदेसाई यांनी त्यांच्या घराला भेट देऊन ते पूर्ववत बांधून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या माय-लेकीला स्वतःचे घर मिळाले.

गृहप्रवेशावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, जि. पं. सदस्य सुरेश केपेकर, भाटीचे सरपंच चंद्रकांत गावकर, नेत्रावळीच्या सरपंच बुंदा वरक, मळकर्णेचे सरपंच तथा भाजप अध्यक्ष राजेश गावकर, नगराध्यक्ष संतीक्षा गडकर, उपनगराध्यक्ष संगमेश्वर नाईक, सुहास देईकर, नगरसेवक इकबाल सय्यद, जागेचे मालक शशिकांत वेळीप, पंचसदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच चंद्रकांत गावकर, राजेश गावकर यांनीही विचार मांडले.

जागामालकांचे सहकार्य

गावकर कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीनंतर सरपंच चंद्रकांत गावकर यांनी पुढाकार घेतला आणि या जागेचे मालक शशिकांत वेळीप यांच्याशी चर्चा केली. तसेच मंत्री सुभाष फळदेसाई आणि भाजप कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हे घर पुन्हा उभे करण्यात आले. गावकर कुटुंबाला तात्पुरता आसरा दिलेले त्यांचे शेजारी कृष्णा भंडारी यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले.

श्रीमती आणि तिची मुलगी हालाखीच्या स्थितीत दिवस घालवायच्या. मुलगी दिव्यांग असून श्रीमती यांना आता कष्टाची कामे होत नाहीत. त्यातच घर आगीत भस्मसात झाले होते. अखेर कार्यकर्त्यांचा सहकार्याने घराचे काम पूर्ण झाले. यापुढेही या कुटुंबाला आवश्‍यक ती मदत देऊ.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

SCROLL FOR NEXT