Sanguem constituency BJP workers are upset as Subhash Phaldesai's name is not in the cabinet Dainik Gomantak
गोवा

पाचवेळा निवडून येऊन ही मंत्रिपद नाही, सांगे भाजपात नाराजी

'मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे'

दैनिक गोमन्तक

केपे : सांगे मतदारसंघाला यावेळी तरी मंत्रिपद द्यावे अशी मागणी सांगे भाजपा मंडळाने केली आहे. आज आठ मंत्र्यांची शपथविधी झाला असून यात सुभाष फळदेसाई यांचे नाव नसल्याने सांगे भाजपा मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.

सांगे मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला असून पाच वेळा सांगेतून आमदार (MLA) निवडून दिला आहे पण अजूनपर्यंत मंत्रीपदापासून वंचित असल्याने यावेळी तरी मंत्रिपद मिळाले पाहिजे असे माजी आमदार वासुदेव गावकर यांनी सांगितले. सांगे मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या बराच मोठा असून अनुसूचित जमातीच्या लोकांचा अधिक भरणा असल्याने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे आहे व यासाठी सांगेला मंत्रिपदाची आवश्यकता आहे असे गावकर यांनी सांगितले.

फोंडा (Ponda) तालुक्याला तीन मंत्रीपदे मिळाली असून सांगे (sanguem) मात्र मंत्रीपदापासून वंचित आहे उर्वरित तीन मंत्रीपदाच्या नावांची घोषणा झाली नसून यात सुभाष फळदेसाई यांचे नाव समाविष्ट करावे अशी आमची मागणी आहे असे जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी सांगितले. सांगे मतदारसंघाला मंत्रिपद मिळाल्यास विकासकामे तशेच रोजगाराच्या समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात असे केपेकर यांनी सांगितले. सांगे मतदारसंघातिल जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून याचे बक्षीस म्हणून यावेळी तरी सुभाष फळदेसाई (Subhash Phaldesai) यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी केपेकर यांनी केली आहे.

आज शपथविधी सोहळ्यात सांगेला मंत्रिपद मिळणार या आशेने शेकडो भाजपा (BJP) कार्यकर्ते शपथ विधी सोहळ्याला गेले होते पण सांगे मतडसरसंघाचे नाव मंत्रीपदाच्या यादीत नसल्याने आमची घोर निराशा झाली असे लोकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

SCROLL FOR NEXT