Adivasi Mahotsav Dainik Gomantak
गोवा

Adivasi Mahotsav: सांगेत रंगणार आदिवासी महोत्सव! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन; कला, वनौषधी, हस्तकलांचे भरणार प्रदर्शन

Adivasi Mahotsav 2026: महोत्सवात राज्यातील आदिवासी संस्कृती, कला खाद्यपदार्थ, हस्तकला, वनौषधी यांच्यावर जास्त भर देण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: वाडे सांगे येथे २४, २५ व २६ जानेवारी रोजी आदिवासी महोत्सव आयोजित करण्यात आला असून यंदा हा महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी समाजाचे युवा कार्यकर्ते जोरात तयारीला लागले आहेत. महोत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी युवा वर्गाने संपूर्ण मतदार आपल्या हाती घेतले आहे.

महोत्सवात राज्यातील आदिवासी संस्कृती, कला खाद्यपदार्थ, हस्तकला, वनौषधी यांच्यावर जास्त भर देण्यात आला आहे. स्वयंसहाय गटातर्फे विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन तशीच विक्री होणार आहे.

या महोत्सवाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असून यावेळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे आयोजन समितीचे अध्यक्ष सुहास देईकर यांनी वाडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

माजी आमदार वासुदेव गावकर, सरपंच चंद्रकांत गावकर, रुपेश गावकर, प्रशांत येवडकर, सुनील गावकर व देविदास कालेकर उपस्थित होते. गेल्या वर्षी पहिल्यांदाच वाडे सांगे येथे आदिवासी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. सदर सहभाग पाहून यावर्षी मोठी तयारी करण्यात आली आहे, असे सुहास देईकर यांनी सांगितले.

अशा महोत्सवातून स्वयंसाहाय्य गटातील महिलांना सक्षम करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे वासुदेव गावकर यांनी सांगितले. सदर महोत्सवात विविध पारंपरिक खेळ स्पर्धा बरोबरच मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. २६ रोजीच्या समारोपाला सभापती गणेश गावकर, कला व सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, गोविंद गावडे तसेच समाजाचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT