Illegal Houses Demolished Dainik Goamantak
गोवा

Illegal Houses Demolished: सांगोल्डात विरोध धुडकावून 15 बेकायदा घरे जमीनदोस्त; अनेकांना अश्रू अनावर

Illegal Houses in Sangolda Demolished: यावेळी अतिक्रमणकर्त्यांनी विशेषत: महिलांनी घरे पाडण्यास विरोध दर्शविला. मात्र, त्याला न जुमानता प्रशासनाने आज दिवसभरात 15 अनधिकृत घरे जमीनदोस्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Houses in Sangolda Demolished

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर कोमुनिदादच्या प्रशासकांनी सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जमिनीतील तब्बल २२ बेकायदा घरे पाडण्याचे काम शुक्रवारी (ता.१२) हाती घेतले.

यावेळी अतिक्रमणकर्त्यांनी विशेषत: महिलांनी घरे पाडण्यास विरोध दर्शविला. मात्र, त्याला न जुमानता प्रशासनाने आज दिवसभरात १५ अनधिकृत घरे जमीनदोस्त केली.

सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जागेत तब्बल २२ घरे उभारली होती. ती बेकायदेशीर असल्याचा ठपका कोमुनिदाद प्रशासनाने ठेवला होता. २०१२ सालापासून कोमुनिदाद आणि या घरमालकांमध्ये कायदेशीर लढा सुरू होता.

येथील सर्व्हे क्र. ८१/१मधील ही २२ बांधकामे पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. याविषयी या घरमालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही बांधकामे हटविण्याचा आदेश दिला. तसेच उत्तर विभाग कोमुनिदाद प्रशासकांना ही अनधिकृत घरे हटविण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथक उपलब्ध करून दिले. त्यानुसार सकाळी ९.३० वाजता अतिक्रमण निर्मूलन पथक आणि मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी हजर झाला. प्रशासनाला २५ एप्रिलपर्यंत या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करायचा आहे.

लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले

ज्या घरांवर कारवाई केली, त्यातील अनेकांनी दावा केला की, मागील ४० ते ५० वर्षांपासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत. अनेक लोकप्रतिनिधींनी आम्हास ही घरे बांधताना विश्वासात घेतले आणि आज शेवटच्या क्षणी अशाप्रकारे आम्हाला वाऱ्यावर सोडण्यात आले. काहीजणांच्या दाव्याप्रमाणे, त्यांचा आणि त्यांच्या मुलाबाळांचा जन्म सांगोल्डात झाला आहे.

मतदानावर बहिष्कार घालणार

या लोकसभा निवडणुकीवेळी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार या बेघर लोकांनी केला आहे. सरकारने आम्हाला राहण्यासाठी इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी किंवा राहण्याची तात्पुरती व्यवस्था करावी.

केवळ निवडणुकीवेळी मते मागण्यासाठी आमच्या दारी लोकप्रतिनिधी येतात. मग आता आमच्यावर हा अन्याय का, असा प्रश्न या लोकांनी केला.

अतिक्रमणास पाठबळ देणारे कोण?

कोमुनिदादच्या म्हणण्यानुसार, या लोकांनी अनधिकृतपणे खुल्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधली. मुळात ही जागा वनक्षेत्र म्हणून टीसीपीने सीमांकित केली होती; परंतु काही लोकप्रतिनिधींनी या लोकांना चुकीची दिशा दाखवत यास्थळी अतिक्रमण करण्यास पाठबळ दिले, असा आरोप कोमुनिदाद प्रशासनाने केला.

नळे काढताना एक जखमी

अतिक्रमण निर्मूलन प्रक्रियेवेळी एकजण आपल्या घराच्या छतावर चढून नळे (कौले) काढत असताना घसरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला.

जखमीला म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे, तर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला परावृत्त केले.

४० वर्षांपासून हे लोक सांगोल्डात वास्तव्यास आहेत. त्यामुळे मानवतावादीच्या दृष्टीकोनातून त्यांचा विचार झाला पाहिजे. सरकारने तसेच स्थानिक आमदारांनी या लोकांना निवारा देण्याची जबाबदारी स्वीकारावी. या लोकांना हेतूपुरस्सर लक्ष्य केले जात आहे. मी बेकायदेशीरतेला पाठिंबा देत नाही; परंतु त्यांच्या पुनर्वसनाचा विचार झाला पाहिजे.

- जयेश साळगावकर, माजी आमदार.

अनेकांना अश्रू अनावर

यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथक व उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासनाने या लोकांना घरातील साहित्य बाहेर काढण्यासाठी वेळ दिला. सुरवातीला काहींनी यास विरोध केला. विशेषत: महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात आक्रोश केला.

मात्र, विरोधास न जुमानता ही कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमणकर्त्यांनी विरोध करतच साहित्य घराबाहेर काढले. हे करताना अनेकांना अश्रू अनावर झाले. काहींनी प्रशासन तसेच सरकारला शिव्या-शाप देत टाहो फोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

Smriti Mandhana Marriage: शुभ मंगल सावधान! स्मृती मानधना-पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख समोर, 'या' दिवशी पार पडणार विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT