Peoples on road aSangem Dainik Gomantak
गोवा

Sangem Death Case: अनिता फर्नांडिस यांच्या मृत्यू प्रकरणाचे सांगेत पडसाद, नागरिक एकवटले

Goa: पोलिस स्थानकाबाहेर गर्दी जमली असून तक्रारदार महिलेविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमन्तक

Sangem: अनिता फर्नांडिस यांच्या अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद सांगेत उमटू लागले असून काल घटना घडली त्यावेळी दुःख अनावर होऊन अनेकांनी झाड तोडण्यासाठी हरकत घेणाऱ्या महिलेला जाब विचारला.

त्यावेळी ती महिला तावातावाने जागा आपली, पण झाड पोलिसांचे असे सांगत होती, पण त्याच महिलेने काल निवृत्त शिक्षिका कार्लथ कार्व्हालो यांच्याविरुद्ध सांगे पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली असल्यामुळे सांगेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

सविस्तर घटनेनुसार चालत्या गाडीवर झाड पडून अनिता फर्नांडिस यांचा काल जागीच मृत्यू होण्याची दुर्घटना घडली. त्यावेळी झाड कापण्यास हरकत घेणाऱ्या महिलेला काही संतप्त लोकांनी जाब विचारला,

पण काल त्या महिलेने कार्लथ कार्व्हालो यांच्याविरुद्ध सांगे पोलिस स्थानकात तक्रार नोंदविताना यापुढे काही घडल्यास कार्लथ कार्व्हालो ही जबाबदार राहणार असून तिनेच लोकांना भडकावले असल्याची तक्रार नोंदविली आहे.

या तक्रारीची नोंद घेऊन सांगे पोलिसांनी कार्लथ कार्व्हालो यांना चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले असता संतापलेल्या सांगेतील ग्रामस्थांनी सांगे पोलिस स्थानकाबाहेर गर्दी केली.

पोलिस स्थानकात कार्लथ कार्व्हालो यांनी आपली बाजू मांडताना आपण कोणालाही भडकावले नसल्याचे स्पष्ट केले.

वन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, झाड कापण्यासाठी यापूर्वीच ना हरकत दिलेली होती. असे असताना स्थानिक प्रशासनाने झाड न कापल्यामुळेच अनिता फर्नांडिस या महिलेचा निष्पाप बळी गेल्याचा संताप पोलिस स्थानकाबाहेर जमलेल्या लोकांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi: वाळपईत वाहतुकीची कोंडी, रस्त्यालगतची कामे ठरतायेत डोकेदुखी; वाहनांच्या लागतात रांगा

Goa Nightclub Fire: 'पळपुटे' लुथरा बंधू सापडले! फुकेटमधून घेतलं ताब्यात, पासपोर्ट निलंबित; गोवा पोलिसांचे मिशन Successful

Goa Live News: हॉटेलच्या टेरेसवरून पडून पश्चिम बंगालच्या 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Goa Nightclub Fire: क्लब मालकाकडून 25 लाख रुपयांचा हफ्ता पोहोचत होता, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप

Omkar Elephant: ओंकार हत्तीची दोडामार्गात पुन्हा एन्ट्री; बागायतींचे मोठ्या प्रमाणात केलं नुकसान, कळपात परतण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT