Swayampurna Award Dainik Gomantak
गोवा

Swayampurna Award : उत्कृष्ट ‘स्वयंपूर्णा’ मित्रांचा सन्मान

रोख बक्षीस, प्रमाणपत्र प्रदान : भुईपाल येथील संगीता झोरे व रामी वरक यांना लाभ

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या अधिकार क्षेत्रातील भुईपाल प्रभाग क्रमांक ९ मधील संगीता झोरे व रामी वरक यांना जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वयंपूर्णा’ कार्यक्रमात स्वयंपूर्णा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार बुधवार, ५ रोजी पणजी येथील नियोजन व सांख्यिकी संचालनालयाच्या कार्यालयात खात्याच्या उपसंचालिकांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

यंदा राज्य सरकारच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले होते. त्यानुसार पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईपाल-भेडशेवाडा येथील संगीता झोरे व डोबवाडा येथील रामी वरक यांची दुग्ध उत्पादनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्वयंपूर्णा मित्रांतर्फे नावे पाठविण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.

कार्यालयात बोलावून सत्कार

महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमात झोरे व वरक यांना पोहोचता आले नव्हते, त्यामुळे खात्याच्या वतीने पाठपुरावा करून त्यांना कार्यालयात बोलावून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आमदार डॉ. दिव्या राणे यांना याकामी पुढाकार घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून दुग्धोत्पादनात कार्य करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांची दखल घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद देते. राज्य सरकारने सुरू केलेल्या या स्वयंपूर्णा पुरस्कार उपक्रमाविषयी समाधान आहे.

- स्मिता मोटे, पंच, भुईपाल प्रभाग क्र. ९

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT