सांगे (Sange) नगरपालिकेने बांधलेले पालिकेचे गेस्ट हाऊस गेल्या एक वर्षापासून वापराविना ठेवले आहे. पालिकेच्या मंडळाला केवळ उद्घाटन करण्याची घाई होती. घाई गडबडीत उद्घाटन केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करणार असल्याचा घोषणा वर्षभरात हवेत विरली. कोणतीही सुविधा नसताना आपला कार्यकाळ संपणार म्हणून पालिका मंडळाने अर्धवट गेस्ट हाऊसचे उद्घाटन केले होते. त्यानंतर विद्यमान पालिका प्रशासनाने कोणत्याही हालचाली केल्या नसल्याने एक वर्षे वाया गेले आहे. ( Sange Palika's guest house fell into disuse!)
सांगे पालिकेने स्वतःचे गेस्ट हाउस असावे म्हणून सुवर्ण जयंती निधीतून सुमारे एक कोटी रुपये खर्चून केवळ गेस्ट हाउस बांधले आहे. त्यात कोणत्याही सुविधा नाही. अजूनही सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. पूर्ण गेस्ट हाउस तयार होण्यासाठी फर्निचर, किचन सामग्री, बेडरूम, सभागृह सजावट, आसन व्यवस्था, पाणी, वीज, पार्किंग सोय, रस्ता अशा अनेक गोष्टी अपुऱ्या असताना निवडणूक जवळ आली म्हणून आपली नावे उद्घाटन फलकावर लागावी म्हणून नगरसेवक मंडळाने केलेला हट्ट म्हणून आज या अर्धवट गेस्ट हाऊसची दुर्दशा झाली आहे.
सांगे पालिकेला उत्पन्नाचा आधार नाही, म्हणून कर्मचाऱ्यांना चार पाच महिन्यातून एकदा पगार मिळतो. नव्याने बांधलेले गेस्ट हाउस जर परिपूर्ण करुन पालिकेने स्वतः किंवा कंत्राटी पद्धतीने चालविण्यास दिल्यास चांगले उत्पन्न तयार होऊ शकते. असा प्रयत्न गेल्या वर्षभरात व्हायला हवा होता, ते करण्यासाठी पालिका प्रशासन कमी पडले परिणामी उद्घाटन होऊन एक वर्षे वाया गेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.