Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Excise Building at Dodamarg: अबकारी खात्याच्या इमारतीला लागून असलेल्या पोलिस चौकी इमारतीला नवा साज चढवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अबकारी खात्याच्या इमारतीचा तातडीने विकास होणे आवश्यक आहे. अन्यथा ही इमारत कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही.
Dodamarg Excise Building
Excise Building at DodamargDainik Gomantak
Published on
Updated on

Dodamarg Checkpost's Heritage Building in Ruins

डिचोली: गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील दोडामार्ग येथील तपासणी नाक्यावरील अबकारी खात्याच्या इमारतीची दुर्लक्षामुळे दुरवस्था झाली असून, दिवसेंदिवस ती कमकुवत बनत चालली आहे.

मोडकळीस आलेल्या या पोर्तुगीजकालीन इमारतीला नवीन साज कधी चढणार त्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. अबकारी खात्याच्या इमारतीला लागून असलेल्या पोलिस चौकी इमारतीला नवा साज चढवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अबकारी खात्याच्या इमारतीचा तातडीने विकास होणे आवश्यक आहे. अन्यथा ही इमारत कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही.

दोडामार्ग तपासणी नाक्यावरील अबकारी खात्याची इमारत पोर्तुगीजकालीन आहे. मात्र या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ही इमारत अत्यंत कमकुवत बनली आहे. या इमारतीची वेळीच दुरुस्ती झाली नाही, तर ती कोसळण्याचा धोका असून तशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोडामार्ग येथे अबकारी खात्याचा तपासणी नाका आहे. नाक्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दिवसरात्र वास्तव्य असते. मात्र, ही इमारत मोडकळीस आल्याने अधिकारी आणि अबकारी रक्षक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

इमारत अगोदर वाचवा !

तपासणी नाक्यावरील अबकारी खात्याच्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी आहे. दोडामार्ग येथील तपासणी नाक्यावरील पोलिस चौकीच्या विकसित कामाचे गेल्या सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. सीमेवरील सर्व तपासणी नाके एकाच छताखाली आणण्याचा प्रस्ताव आहे, असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. सरकारचा हा प्रस्ताव मार्गी कधी लागणार ते लागू द्या. तूर्त दोडामार्गवरील अबकारी इमारत वाचविण्याची गरज आहे,असे मत सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

Dodamarg Excise Building
Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

माकडांचा वाढता उपद्रव

इमारतीच्या छपराची मोडतोड झाली असून, ठिकठिकाणी कौलेही फुटली आहेत. इमारतीच्या मागच्या बाजूने तर स्थिती भयानक आहे. काही लाकडी वासेही मोडलेले आहेत. पावसाळ्यात या इमारतीत गळती लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मनमोकळेपणाने ड्युटी करता येत नाही. सध्या प्लास्टिकचे आच्छादन घालून या इमारतीचे छप्पर झाकले आहे. प्राप्त माहितीनुसार दोडामार्ग परिसरात माकडांचा उपद्रव वाढला असून, ही माकडे इमारतीच्या छपरावर उड्या मारत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com