Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Goa Education Department: उच्च शिक्षण संचालनालयामार्फत गोवा राज्य शिक्षणाच्या कक्षेत असलेल्या विविध विभागांतील प्रमुख अधिकाऱ्यांसाठी परिवर्तनशील नेतृत्व विकास कार्यक्रम नुकताच पुण्यातील प्रतिष्ठित इन्फोसिस डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला.
Development Program for Goa Education Department
Goa Education DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

Pune's Infosys Center Sees Goa Education Officials' Capacity Building

पर्वरी: उच्च शिक्षण संचालनालयामार्फत गोवा राज्य शिक्षणाच्या कक्षेत असलेल्या विविध विभागांतील प्रमुख अधिकाऱ्यांसाठी परिवर्तनशील नेतृत्व विकास कार्यक्रम नुकताच पुण्यातील प्रतिष्ठित इन्फोसिस डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्राशी निगडित अधिकाऱ्यांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणे हा उद्देश या कार्यक्रमामागील होता. यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, उच्च शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या अधिकाऱ्यांना पर्वरी एससीईआरटी येथे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, (आयएएस) यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर उपस्थित होते.

एससीईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी इन्फोसिस, पुणे येथे उद्‍घाटन समारंभात आपले मनोगत व्यक्त केले. नेतृत्व विकास कार्यक्रमाचे समन्वयक प्रो.डॉ. नियॉन मार्शेन यांनी आभार मानले.

Development Program for Goa Education Department
Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

३२ जणांचा सहभाग

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, उच्च शिक्षण संचालनालयातील ३२ अधिकाऱ्यांचा यात समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com