पणजी: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) गोवा राज्यासाठी डीएम (एन्डोक्रोनाेलॉजी, मधुमेह) या अभ्यासक्रमासाठी मान्यता दिली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने हा अभ्यासक्रम २०२२-२३ मध्ये सुरू करण्यासाठी एनएमसीकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार एनएमसीने गोवा विद्यापीठांतर्गत हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. या प्रस्तावांतर्गत दोन जागा मंजूर केल्या आहेत. अशाप्रकारचा अभ्यासक्रम देशातील मोजक्याच वैद्यकीय महाविद्यालयांत उपल्बध आहे.
(Sanction of 2 seats in GMC for DM Endochronology)
गोव्यात मधुमेहाचे रुग्ण अधिक आहेत, या मधुमेहांमुळे पुढे वेगवेगळे आजार निर्माण होतात. मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर निर्माण करण्यासाठी या अभ्यासक्रमाचा निश्चित फायदा होणार आहे. गोमेकॉला एनएमसीकडून मिळालेली मंजुरी ही राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. राज्यातील आरोग्य खाते जनतेला सर्व आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देत आहे. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य खात्याचा झपाट्याने कायापालट झाला आहे. काही वर्षांपासून राज्यात उपलब्ध नसणाऱ्या सुविधाही गोव्यात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यासाठी मंत्री राणे हे या खात्यात अत्यंत गांभीर्याने लक्ष घालून काम करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.