Court Canva
गोवा

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Sancoale Sarpanch Marriage: वास्को न्यायालयाने वेर्णा पोलिसांना निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या ६९ व ८२(२) कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

Sameer Panditrao

वास्को: पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला असल्याचे सांगून दुसऱ्या महिलेशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी सांकवाळचे प्रभारी सरपंच डेरिक वालिस (वय ३८ वर्षे) याच्याविरोधात वेर्णा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

गुन्हा नोंद करण्यासंबंधी वास्को न्यायालयाने वेर्णा पोलिसांना निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या ६९ व ८२(२) कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने याप्रकरणी वास्को न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंबंधी सुनावणी होऊन वास्को प्रथमवर्ग न्यायाधीश पूजा देसाई यांनी १८ जून रोजी या याचिकेवर निकाल दिला होता. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट मिळाल्याचे सांगून डेरेक वालिस याने पीडित महिलेशी मुंबईत विवाह निबंधकांसमोर लग्न केले होते.

त्यानंतर वालिस याने पीडित महिलेशी विविध प्रसंगी लैंगिक संबंध ठेवले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे कळताच पीडित महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकाच्या पोलिस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT