Sancoale Panchayat sada varunapuri road garbage dumping issue 
गोवा

Sancoale Panchayat: सडा वरुणापुरी मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; सांकवाळात प्रदूषणासह विविध आजारांना आमंत्रण

Goa illegal garbage dumping: सडा वरुणापुरी मार्गावरून वेर्णाच्या दिशेने येताना वाटेत उजवीकडे प्लास्टिक आवरणाने झाकलेला एक मोठा ढिगारा दृष्टीस पडतो.

गोमन्तक डिजिटल टीम

सडा वरुणापुरी मार्गावरून वेर्णाच्या दिशेने येताना वाटेत उजवीकडे प्लास्टिक आवरणाने झाकलेला एक मोठा ढिगारा दृष्टीस पडतो. सांकवाळ पंचायत क्षेत्रातील कचरा तेथे झाकून ठेवलेला आहे. केवळ १५० चौमी. जागेत कचरा व्यवस्थापन करण्याचा अयशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला दिसतो.

रस्त्यावरून या ठिकाणी जाण्यासाठी उजवीकडे दिसणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यावरून गाडी काही मीटर खाली उतरावी लागते. त्याच्याच मागे दाटीवाटीची वस्ती आहे. या पंचायत क्षेत्रातील कचऱ्यावर प्रक्रीयेसाठी झुआरी कंपनीने तीन टन क्षमतेचे सयंत्र दिले पण त्यानेही कधीच मान टाकली आहे. तेथे केवळ प्लास्टीक कचऱ्याचे तुकडे करण्याचे काम (बेलिंग) सुरू असते. तो कचरा गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळ ट्रक पाठवून कर्नाटकातील सिमेंट कंपनीत जाळण्यासाठी पाठवते.

सांकवाळमध्ये ११ प्रभाग आहेत. त्यापैकी ४ प्रभागांत दाट लोकवस्ती आहे. तेथे कचरा संकलन हीच मोठी समस्या आहे. लोक इतस्ततः कचरा फेकतात. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसतात. रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्रात साठवलेल्या कचऱ्यातून काही विकता येण्याजोग्या गोष्टी मिळतील का, याची पाहणी काही कामगार करत होते. उघड्या हातानेच हे सारे सुरू होते. तेथे गेल्यावरही त्यांच्या कामात खंड पडला नव्हता. कोणीतरी तरी पाहणीसाठी आले असेल, अशा निर्विकार वृत्तीने ते काम करत होते. तेथे साठवलेल्या एका कचऱ्यावर एक महिला कामगार पाणी मारत होती. तसे का करते याचे उत्तर तिच्याकडे नव्हते. कोणीतरी पाणी मार, असे सांगितल्याने ते काम ती करत होती.

सांकवाळ येथील कचरा संकलन केंद्रात एका बाजूला पक्के बांधकाम तर दुसऱ्या बाजूला कच्चे बांधकाम करून शेड उभी केलेली आहे. कचरा संकलन केंद्रासाठी ती जागा अपुरी पडत असल्याचे तेथे पाय ठेवल्यावर लक्षात येईल एवढा कचरा तेथे साचला आहे. ओल्या कचऱ्याचे जणू संकलनच केले जात नसावे ओला व सुका कचरा एकत्रितपणे संकलीत केला जात असावा, असे पाहणीवेळी जाणवले. एकंदर सारी स्थिती दयनीय होती. बेताळभाटी पंचायत इमारतीलगतच महामंडळाने दिलेले बेलिंग यंत्रही झाकून ठेवलेले होते. यावरून तेथे प्लास्टीकच्या कचऱ्याचे तुकडे करून ते जाळण्यासाठी सिमेंट कंपन्यांना पाठवण्यात येत नसल्याचे लक्षात आले.

कचऱ्यामुळे प्रदूषण, आजारांना आमंत्रण

पंचायत, पालिकेने गोळा केलेला कचरा, ज्याचे रिसायकलिंग करण्यात आलेले आहे असा कचरा किंवा जमिनीची भर घालण्यासाठी वापरलेल्या कचऱ्याचा समावेश व्यवस्थापन केलेल्या कचऱ्यात केला जातो. एकूणच अशा कचऱ्याचे नियोजन केलेले असते. तर व्यवस्थापन नसलेल्या कचऱ्यात पर्यावरणात टाकलेल्या ढिगाऱ्यांचा समावेश होतो. हे ढिगारे उघड्यावर अनियंत्रित आगीत (प्लास्टिक) जाळल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रदूषण करतात. यानंतर यातून बाहेर पडलेले सूक्ष्म कण आणि कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू हृदयरोग, श्वसन विकार, कर्करोग आणि अनेक मेंदू विकारांसाठी कारणीभूत ठरतात. असे भयावह वातावरण ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेताना पहावयास मिळाले.

ओल्या कचऱ्याचे संकलनच नाही

बेताळभाटी परिसरात चौकशी केली असता पंचायतीकडून ओला कचराच गोळा केला जात नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली. ११ प्रभाग असलेले हे पंचायत क्षेत्र पर्यटन नकाशावर आहे. अनेक हॉटेल्स या परिसरात आहेत. तेथील कचरा जातो कुठे याची विचारणा केल्यावर जनावरांना खाऊ घातला जातो, असे उत्तर मिळाले. गावात मोठे गृहनिर्माण संकुले आहेत. त्यांच्या कचऱ्याचे काय होते याचे उत्तर मात्र कोणाकडे नव्हते. कचऱ्याचे व्यवस्थापन करावे लागते हे गावीही नसावे, असे वातावरण पहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT