Panchayat Meeting Dainik Gomantak
गोवा

Sancoale: सांकवाळ पंचायतीची बैठक गुंडाळली फक्त 5 मिनिटांत! 65 लाखांच्या बिलांना मंजुरी; पंच नाईक यांचे आरोप

Sancoale Panchayat Meeting: विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सांकवाळ पंचायत मंडळाची मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली होती.

Sameer Panditrao

वास्को: सांकवाळ पंचायतीच्या बैठकीला मी व दुसरे पंचसदस्य मोर्विलो कार्व्हालो उपस्थित असतानाही आम्हाला सह्या करण्यासाठी इतिवृत्त पुस्तक दिले नाही. हा लोकशाहीचा खून आहे. आमचा लोकप्रतिनिधीचा अधिकार काढून घेतला गेला. याप्रकरणी संबंधित यंत्रणांनी योग्य ती दखल घेण्याची गरज असल्याचे पंच तुळशीदास नाईक यांनी सांगितले.

ही बैठक अवघ्या चार-पाच मिनिटांमध्ये गुंडाळण्यात आली. यादरम्यान ६५ लाख रुपयांच्या बिलांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला. ही बैठक बेकायदेशीर असल्याप्रकरणी आम्ही पंचायत संचालकांना सोमवारी (ता.१७) निवेदन दिले होते. त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचे ते म्हणाले.

विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सांकवाळ पंचायत मंडळाची मंगळवारी (ता.१८) बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला सरपंच रोहणी तोरस्कर, पावलिना आझावदो, निधी नाईक, अनुषा लमाणी या काही कारणास्तव गैरहजर होत्या. या बैठकीला तुळशीदास नाईक, मोर्विलो कार्व्हालो यांच्यासह सत्ताधारी गटाचे पाचजण असे सातजण उपस्थित होते. बैठकीला आरंभ झाल्यावर नाईक व कार्व्हालो यांनी सह्या करण्यासाठी इतिवृत्त पुस्तक मागितले.

दरम्यान, सांकवाळ पंचायतीची मंगळवारी (ता.१८) बोलाविण्यात आलेली बैठक पूर्ण झाल्याचा दावा उपसरपंच डेरेक वालिस यांनी केला. चार डिसेंबरची बैठकही पूर्ण झाल्याने तीचे इतिवृत्तांत वाचून तिची पुष्टी करण्यात आली. या बैठकीत गत बैठकीप्रमाणे पंच तुळशीदास नाईक यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही लोकांचे प्रश्न हाती घेत आहोत, तथापी दोन पंचांकडून आम्हाला अडथळा आणला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT