Sancoale Comunidade Demolition 
गोवा

बेकायदेशीर 31 घरांवर बुलडोझर! सांकवाळ कोमुनिदाद जागेतील बांधकामे पाडण्यास प्रारंभ

याबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रभारी उदय प्रभूदेसाई यांनी जारी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sancoale Comunidade Demolition: सांकवाळ कोमुनिदादच्या जमिनीत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या ३१ बेकायदेशीर बांधकामावर आज पासून बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यास सुरुवात करण्यात आली.

सकाळी ११ वाजता कारवाईस सुरुवात करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १० घरे जमीनदोस्त करण्यात आली. उर्वरीत घरांवर उद्या कारवाई सुरू राहणार आहे.

सांकवाळ कोमुनिदादच्या सर्वे क्र. १५४/१ आणि ९०/१ या जमिनींत अतिक्रमण करून ६२ बांधकामे उभारण्यात आली व आहेत. यांतील सर्वे क्र. १५४/१ व जमिनींमधील ३१ बांधकामे बुधवार, २९ रोजी सकाळी जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली.

याबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रभारी उदय प्रभूदेसाई यांनी जारी केला आहे. या प्रकरणी सांकवाळ कोमुनिदादीचे अ‍ॅटर्नी जयेश फडते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती.

सांकवाळ कोमनिदादमध्ये सर्वे क्रमांक १५४/१ मध्ये २२,८५० चौ. मी. आणि सर्वे क्रमांक ९०/१ मध्ये १४,१७५ चौ. मी. जमीन असल्याची माहिती याचिकेत मांडली होती. सांकवाळ कोमुनिदादने प्रथम १० फेब्रुवारी २०२२ रोजी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक यांच्याकडे तक्रारी दाखल करून कारवाईची मागणी केली होती. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी वेर्णा पोलिसांतही तक्रार दिली होती.

अ‍ॅटर्नी जयेश फडतेंची खंडपीठात धाव

- संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्यामुळे अ‍ॅटर्नी जयेश फडते यांनी खंडपीठात धाव घेतली. याचिकेत त्यांनी राज्य सरकार, मुरगाव नियोजन जिल्हाधिकारी, दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक, सांकवाळ पंचायत, पंचायत उपसंचालक, संतोष मुरारी नाईक, राजेश मुरारी नाईक आणि रत्नाकर प्रभू यांना प्रतिवादी केले.

- त्यांनी ३१ बेकायदेशीर बांधकामे उभारल्याची माहितीही खंडपीठाला दिली. खंडपीठाने पंचायत उपसंचालक आणि मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाच्या (एमपीडीए) सदस्य सचिवांना दोन्ही जमिनींतील बांधकामांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे, तसेच कारवाईचे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT