Bhutani Project Sancoale Updates Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: 'भूतानी'च्या जागेत झाडांची कापणी! वनखात्याच्या पाहणीत धक्कादायक बाब समोर; कारवाईकडे सर्वांचे लक्ष

Bhutani Project Sancoale Inspection: भूतानी प्रकल्पाच्या परिसरात आग लागल्याप्रकरणी काही स्थानिकांनी २४ फेब्रुवारी रोजी वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Sancoale Bhutani Project Inspection News

वास्को: वन खात्याचे दक्षिण विभागाचे उपवनसंरक्षक संतोष कुमार रेड्डी यांनी सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पाच्या जागेची बुधवारी (ता.५) पाहणी केली. यासंबंधीचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देणार आहेत.

मंगळवारी (ता.४) वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यावेळी तेथे विविध जातीची बारा झाडेझुडपे कापली असल्याचे नजरेस आल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

भूतानी प्रकल्पाच्या परिसरात आग लागल्याप्रकरणी काही स्थानिकांनी २४ फेब्रुवारी रोजी वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार केली होती. त्यानंतर परमेश कन्स्ट्रक्शनतर्फे संबंधित स्थानिकांविरोधात तक्रार करण्यात आली होती.

मात्र, आता वन खात्याने दखल घेताना आग लागलेल्या भागाची तसेच इतर जागेची पाहणी केली. गेल्या दोन दिवसांमध्ये वन खात्याच्या अधिकारी वर्गाने भूतानी प्रकल्पाच्या जागेतील झाडांची पाहणी केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

बुधवारी त्या जागेची पाहणी करताना संतोष कुमार रेड्डी यांच्यासमावेत माजी मंत्री एलिना साल्ढाणा, पीटर डिसोझा, सुकोरिना मार्किस, पिएदाद वालिस वगैरे होते. सुकोरिना व पियादाद यांची त्या ठिकाणी जागा आहे. मात्र, त्यांना त्या ठिकाणी जाता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या जागेतील विविध प्रकारच्या झाडांचे काय झाले, हे त्यांना समजत नव्हते. प्रकल्पाच्या जागेत काही कामगार लहान लहान झाडे कोयत्याच्या साहाय्याने कापत असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी त्यांचे काम थांबविले. तसेच त्यांना तेथे काम करू नका, अशी सूचना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

आम्हाला न्याय मिळण्याची आशा!

सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने ८५५ भूखंडांच्या रूपांतरणास स्थगिती दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, थॉमस व आरावजो समितीने उत्तर व दक्षिण गोव्यातील एकूण ८.६४ चौरस किलोमीटर क्षेत्राचे ८५५ भूखंड खासगी वनक्षेत्र म्हणून निश्र्चित केले होते. त्यामध्ये भूतानी प्रकल्पाच्या जागेचा समावेश होता.

गोवा फाउंडेशनने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले होते. त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. आता आम्हाला न्याय मिळण्याची आशा आहे. गोवा फाउंडेशनच्या ‘पर्यावरण बचाव’ अभियानाला आमचा पाठिंबा आहे. बरोबर एक वर्षापूर्वी आम्ही सांकवाळच्या सांकळ्यो देवाला साकडे घातले होते. त्यानंतर आता आम्हाला आनंदाची बातमी मिळाली आहे. तसेच एक झाड कापा, बारा कापा नाहीतर बाराशे कापा, तो गुन्हाच आहे. त्यामुळे वन खाते कोणती कारवाई करते याकडे आमचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT