Samvadini Yadnya organizing 6th November Fonda  dainik gomantak
गोवा

Goa News : फोंडा येथे 6 नोव्हेंबर रोजी ‘संवादिनी यज्ञा’चे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : सप्तसूर म्युझिक अकादमीचा यावर्षीचा ‘संवादिनी यज्ञ’ ६ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे होणार आहे. रियाजाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उत्सवात अकादमीचे सुमारे चाळीस विद्यार्थी सलग बारा तास संवादिनीवादन करणार आहेत. संवादिनी यज्ञाची संकल्पना सुप्रसिद्ध संवादिनी वादक व संगीतज्‍ज्ञ चिन्मय कोल्हटकर यांची आहे. सकाळी ८ वाजता हा सोहळा सुरू होणार असून रात्री आठ वाजता सांगता होईल.

सकाळी ८ वाजल्यापासून विद्यार्थी रियाजाला सुरुवात करतील. सायंकाळी ५ वाजता स्मृतिचिन्ह वितरणाचा कार्यक्रम असून, त्याला कला व संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे आणि सुप्रसिद्ध तबलावादक आणि गुरू पं. उल्हास वेलिंगकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि शेवटी अकादमीचे संस्थापक चिन्मय कोल्हटकर यांचे संवादिनीवादन होईल. कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT