samuel braganza suicide case goa Dainik Gomantak
गोवा

"वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेलं, 7 तास छळलं..."; सॅम्युअल ब्रागांझा आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप! कुटुंबीयांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

samuel braganza suicide case goa: सॅम्युअल आणि आम्हाला पोलिसांनी चौकशीसाठी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत सलग सात तास ठाण्यात थांबवून ठेवले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: सॅम्युअल आणि आम्हाला पोलिसांनी चौकशीसाठी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत सलग सात तास ठाण्यात थांबवून ठेवले. या काळात सॅम्युअलची दुचाकी जप्त केली. त्याला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेले तसेच भविष्यातील नोकरी, परदेशातील संधी आणि अटकेबाबत पोलिसांनी धमकावले, असा आरोप शुक्रवारी गोळी झाडून आत्महत्या केलेल्या सॅम्युअल ब्रागांझा याच्या कुटुंबीयांनी उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

पोलिसांच्या या छळवणुकीनंतर एका तासातच सॅम्युअलने घरी येऊन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, असाही दावा त्याच्या बहिणीने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. काहींनी सोशल मीडियावर सॅम्युअलची वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करून चारित्र्यहनन केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

तपास अन्य ठाण्याकडे सोपवा

ब्रागांझा कुटुंबीयांनी संबंधित पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांवर कारवाई करण्याबरोबरच या प्रकरणाचा तपास अन्य पोलिस ठाण्याकडे सोपविण्याची मागणी केली आहे.

४ जून रोजी कचरा टाकताना एका व्यक्तीने सॅम्युअलचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओच्या आधारे म्हापसा पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता थेट गुन्हा नोंदविल्याचा आरोप सॅम्युअलच्‍या कुटुंबीयांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT