Mapusa Youth Suicide Dainik Gomantak
गोवा

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Mapusa Youth Suicide: अवघ्या २२ वर्षांच्या सॅम्युअल ब्रागांझा या तरुणाच्या अकाली मृत्यूने संपूर्ण म्हापसा शहर सुन्न झाले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: अवघ्या २२ वर्षांच्या सॅम्युअल ब्रागांझा या तरुणाच्या अकाली मृत्यूने संपूर्ण म्हापसा शहर सुन्न झाले आहे. सॅम्युअलला न्याय मिळावा या मागणीसाठी रविवारी म्हापसा मिलाग्रीस चर्च ते पोलिस ठाण्यापर्यंत एक मूक मेणबत्ती फेरी काढण्यात आली होती. यात कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून आपला रोष आणि दुःख व्यक्त केले.

या दुर्दैवी घटनेच्या तीन दिवसांनंतर कुटुंबीयांनी सॅम्युअलचा मृतदेह अखेर ताब्यात घेतला आणि सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर म्हापसा येथील सेंट जेरॉम चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, म्हापसा पोलिसांनी सॅम्युअलवर दाखल केलेला गुन्हा पूर्णपणे चुकीचा आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लोस फेरेरा यांनी केला आहे.

सुरुवातीला सॅम्युअलच्या कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. जोपर्यंत सॅम्युअलवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि त्याचा कथित व्हिडिओ बनवून तो व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.मात्र, सोमवारी सकाळी कुटुंबीयांनी सौम्य भूमिका घेत सॅम्युअलचा मृतदेह ताब्यात घेतला.

सॅम्युअलने गुरुवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.अ‍ॅड. फेरेरा यांनी सोमवारी सॅम्युअलच्या घरी जाऊन त्याच्या शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र तोफ डागली. ते म्हणाले, ‘कोणताही एफआयआर दाखल करताना त्याला भक्कम कायदेशीर आधार आणि योग्य पुराव्यांची जोड असणे अत्यंत आवश्यक असते.

मात्र, या प्रकरणात तसे कुठेही दिसून येत नाही. ज्या व्हिडिओचा आधार घेतला जात आहे, त्यात प्रत्यक्षात कोणीही कचरा फेकताना दिसत नाही.’ ही संपूर्ण घटना प्रशासकीय आणि नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील अपयशाचा परिणाम असून प्रशासनाने यात तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे.

फेरेरा यांच्या व्यतिरिक्त शहरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख व्यक्ती तसेच जवळचे नातेवाईक व स्थानिकांनी सॅम्युअलच्या घरी भेट दिली व त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, सॅम्युअल ब्रागांझा याच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्यूबद्दल त्यांच्या वाड्यावरील नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

न्यायालयात दाद मागणार; फेरेरा

पोलिसांनी लावलेले कलम २७१ हे कायदेशीरदृष्ट्या कुठेही टिकणारे नाही, असे स्पष्ट करत या चुकीच्या एफआयआर विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे संकेतही अ‍ॅड. फेरेरा यांनी दिले.

अंत्यसंस्काराला शेकडोजणांची उपस्थिती

आज सायंकाळी म्हापसा येथील सेंट जेरॉम चर्चमध्ये सॅम्युअलच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर अत्यंत जड अंतःकरणाने स्थानिक दफनभूमीत त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी म्हापसा आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून सॅम्युअलचे अंतिम दर्शन घेतले आणि त्याला साश्रूनयनांनी निरोप दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT