Sanjay Raut and Narendra Modi; साओ जॅसिंटो  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील साओ जॅसिंटो बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे गरजेचे; शिवसेना

"हे अड्डे सरकार आणि राजकारण्यांचे खिसे भरत असतील. पण यामुळे गोव्याचे नुकसान होत आहे. देशात फक्त असे एकच साओ जॅसिंटो बेट नाही”

दैनिक गोमन्तक

आता दरवर्षी देशभरात 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केली. स्वातंत्र्यदिनी (Independence Day) लाल किल्ल्यावरून (Red Fort) पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात देखील या घोषणाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता. पंतप्रधानांनी घेतलेल्या याच निर्णयावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. आणि आता शिवसेनेनेही (Shivsena) या निर्णयावरून पंतप्रधान आणि केंद्र सरकारला (Government) चांगलेच सुनावले आहे.

एकीकडे ‘मोदींनी जुन्या वेदनेची खपली उचकटून काढली’, अशा शब्दांत सुनावल्यानंतर शिवसेनेने गोवा (Goa) राज्यासह देशभरातील काही ठिकाणांचा दाखला देत या स्थळांकडे बघूनही फाळणीइतकीच वेदनेची कळ येणे आवश्यक आहे, अशी खोचक शब्दांत केंद्राला आठवण करून दिली आहे.

धुंद नशेत ते तिरंगा विसरले असून गोव्यातील ‘कॅसिनो’ म्हणजे स्वतंत्र साओ जॅसिंटो बेटेच आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या आधी गोव्यात राष्ट्रीय ध्वाजावरून काही गैरसमज झाले होते त्याच पार्श्वभूमिवरून शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून गोव्याजवळच्या साओ जॅसिंटो (Sao Jacinto Island) बेटावर स्वातंत्र्यदिनी निर्माण झालेल्या परिस्थितीवर कठोर शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. त्या बेटांवर बाहेरच्यांना पाय सुद्धा ठेवता येत नाही. मात्र या जुगारी बेटांवर फक्त बाहेरच्याच लोकांची वर्दळ आहे आणि त्या धुंद नशेत ते देश, राष्ट्रध्वजाला व या सगळ्यांनाच विसरले आहेत. भारतात फक्त हे एकच साओ जॅसिंटो बेट नाही. गोव्यात आणि देशात अशी बेटे अनेक आहेत. त्यामुळे फाळणीइतकीच या बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे आवश्यक आहे”, अशा शब्दांत सामनामधून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

ध्वजारोहणाचा वाद..

स्वातंत्र्यदिनी गोव्याजवळ असलेल्या साओ जॅसिंटो बेटावर स्थानिकांनी भारतीय नौदलाला तिरंगा फडकावण्याला विरोध केला. या मुद्द्यावरून गोव्यात चांगलेच वातावरण तापले होते. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या बेटावर ध्वजारोहण होणारच असे ठणकावून सांगितल्यानंतर अखेर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाले. त्याच मुद्द्यावरून आता देशभर चर्चा सुरू झाली आहे. “गोव्यातील काही नागरीक आजही त्यांचा बाप गोव्यात नसून पोर्तुगालात असल्याच्या थाटात वावरत असतात. गोव्यातील साओ जॅसिंटो बेट झुआरी नदीच्या काठावर वसलं आहे. हे बेट गोव्यात असूनही असंख्य गोवेकरांना या बेटावर अद्याप पाय ठेवायची परवानगी नाही. कारण येथील लोक बाहेरच्या लोकांना या बेटावर येवू देत नाही”, असं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेनं सामनातून साधला पंतप्रधानांवर निशाणा

“गोवा राज्यात अशा अनेक वस्त्या आणि बेटे आहेत जिथे ड्रग्ज माफियांचा कारभार चालतो. तिथे त्यांचेच सरकार अस्तित्वात आहे. नायजेरिया आणि रशियाचे झेंडे फडकत आहेत. तिथे स्थानिक पोलिसही पाय ठेवायला धजावत नाहीत. गोव्यातील कॅसिनो म्हणजे जुगाराचे अड्डे, जे गोव्याच्या समुद्रात नांगरून पडले आहेत. त्यांचा गोव्याच्या मंगल संस्कृतीशी काय संबंध आहे? हे अड्डे सरकार आणि राजकारण्यांचे खिसे भरत असतील. पण यामुळे गोव्याचे नुकसान होत आहे. देशात फक्त असे एकच साओ जॅसिंटो बेट नाही”, अशा शब्दांत गोव्यात घडलेल्या ध्वजारोहणाच्या या मुद्द्यावर सामनात रोखठोक भूमिका मांडण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT