Gayatri Prasad Prajapati ED money laundering case 
गोवा

खाण घोटाळ्यातील पैसा गोवा, मुंबईत गुंतवला; सपा सरकारमधील माजी मंत्री ईडी चौकशीच्या जाळ्यात

ईडी तपास अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व मालमत्तांचे सध्याचे बाजारमूल्य अंदाजे 50 कोटी रुपये आहे.

Pramod Yadav

Gayatri Prasad Prajapati ED money laundering case: सपा सरकारमध्ये झालेल्या खाण घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणारे तत्कालीन मंत्री गायत्री प्रजापती यांनी मुंबईशिवाय गोव्यातही आपला काळा पैसा गुंतवला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रजापती यांच्या मुंबईतील घरावर सोमवारी छापा टाकला. प्रजापती यांच्या कुटुंबाच्या नावे असलेल्या सहा फ्लॅटवर कारवाई करून ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत.

ईडीला गायत्री यांनी गोव्यातील काही बेनामी मालमत्तांमध्येही गुंतवणूक केल्याचा पुरावा मिळाला आहे.

ईडी अधिकाऱ्यांना सोमवारी छाप्यात सापडलेल्या बेनामी संपत्तीच्या कागदपत्रांची कसून चौकशी केली जात आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनंतर संबधित बेनामी मालमत्ताधारकांना बोलावून त्यांची चौकशी केली जाईल.

मांत्री गायत्री यांनी त्यांचा बहुतांश काळा पैसा मुंबईत गुंतवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. सोमवारी गायत्रीच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकून उघडकीस आलेल्या सहा फ्लॅटची किंमत 15 कोटींहून अधिक आहे.

दोन वर्षांपूर्वीही ईडीने मुंबईतील गायत्री यांचे चार व्हिला जप्त केले होते, ज्यांची किंमत 10 कोटींहून अधिक होती.

ईडीच्या लखनौ आणि मुंबई पथकांच्या या कारवाईत काही बँक खात्यांची माहितीही मिळाली आहे. प्रजापती यांचा मुलगा अनुराग, अनिल आणि सून शिल्पा आणि पूजा यांच्या नावावर हे फ्लॅट खरेदी करण्यात आले होते.

खाण घोटाळ्यात बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने 2021 मध्ये प्रजापतीविरुद्ध तपास सुरू केला होता.

ईडी तपास अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व मालमत्तांचे सध्याचे बाजारमूल्य अंदाजे 50 कोटी रुपये आहे. दोन वर्षांपूर्वी ईडीने गायत्री यांची मुले अनुराग आणि अनिल प्रजापती यांना समन्स बजावून त्यांची चौकशी केली होती.

आता सुनेच्या नावावर सदनिका खरेदी केल्याचा पुरावा मिळाल्यानंतर त्यांनाही चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT