Fire Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: हडफडे येथे सलूनला आग; दोन लाखांची हानी

शॉर्टसर्किटमुळे या सलूनमधील एसीला लाग लागली.

गोमन्तक डिजिटल टीम

हडफडे येथे ‘नमस्ते’ नामक सलून अ‍ॅण्ड ब्युटी स्पामध्ये कथित शॉर्टसर्किटमुळे लाग लागल्याने दोन लाखांचे नुकसान झाले. पिळर्ण अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, ही घटना सोमवार, 27 रोजी सायंकाळी 4.40 वा.च्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे या सलूनमधील एसीला लाग लागली.

घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले व आग आटोक्यात आणली. या आगीत पिळर्ण अग्निशामक दलाने 20 लाखांची मालमत्ता वाचविली.

हे सलून दिनेश चंद्रा यांच्या मालकीचे आहे. या बचावकार्यात पिळर्ण अग्निशामक दलाचे लाडू सावंत, श्याम पाटील, विशाल पाटील, स्वप्नील नाईक, राजेश पिरणकर, विराज कांदोळकर या जवानांनी सहभाग घेतला.

सध्या गोव्यात आंबा काजू सिझन सुरु झालाय. त्यातच वातावरण बदलही होऊ लागलाय. उन्हाची तीव्रता देखील हळूहळू वाढू लागलीय. अशा परिस्थितीत जंगल क्षेत्रातील, बागायतीमधील गवताला, पालापाचोळ्यांना देखील आगी लागण्याचे प्रमाण वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जुगाड की जीवाशी खेळ? स्कूटीवर बर्फाची वाहतूक करणाऱ्या पठ्ठ्याचा थरार व्हायरल; स्टंटबाजी पाहून नेटकरी संतापले

Goa Municipal Administrator: मडगाव, मुरगाव आणि म्हापसा नगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आदेश लागू

Goa Assembly Elections 2027: आगामी विधानसभेसाठी भाजपचा जनसंपर्कावर विशेष भर; आदिवासी आरक्षणाचा विषय चर्चेचा केंद्रबिदू

Goa Mining Auction: 'मेसर्स रॉयलाईन'कडून 12.68 लाखच मिळणार! खाण माल कमी असल्‍याचा कंपनीचा दावा मंत्रिमंडळाला मान्‍य

Goa Education Department: गणवेश, रेनकोटसाठीचे 1,100 रुपये! 15 जुलैपर्यंत थेट खात्यांत; परिपत्रक जारी, 8 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

SCROLL FOR NEXT