Saligao Panchayat Secretary Suspended Dainik Gomantak
गोवा

Saligao Panchayat: विश्वासघात अन् अधिकारांचा गैरवापर! साळगाव पंचायत सचिवाचं तडकाफडकी निलंबन; कागदपत्रांमध्ये फेरफार करणं पडलं महागात

Saligao Panchayat Secretary Suspended: अधिकृत कागदपत्रांची फेरफार आणि प्रक्रियात्मक अनियमितता केल्याच्या आरोपावरून पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी पंचायत सचिव प्रविशा भोंसले यांना तातडीने निलंबित केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: साळगाव ग्रामपंचायतीच्या कामकाजात अधिकृत कागदपत्रांची फेरफार आणि प्रक्रियात्मक अनियमितता केल्याच्या आरोपावरून पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी पंचायत सचिव प्रविशा भोंसले यांना तातडीने निलंबित केले आहे. या निलंबनानंतर भोंसले यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बार्देश गटविकास अधिकारी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंचायतीच्या ५ प्रभाग सदस्यांनी २२ फेब्रुवारी रोजी, यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. सदस्यांच्या दाव्यानुसार, १४ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत बैठकीचे इतिवृत्त २९ जानेवारीच्या बैठकीत सर्वांनी विश्वासाने स्वाक्षरी करून मंजूर केले होते. मात्र, १३ फेब्रुवारीच्या बैठकीत सदस्यांच्या लक्षात आले की, मूळ इतिवृत्तात ‘इतर विषय’ या नावाखाली अशा काही ठरावांची नोंद करण्यात आली आहे, ज्यावर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नव्हती.

गटविकास अधिकाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी सादर केलेल्या अहवालात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पंचायतीच्या सचिवाने अधिकारांचा गैरवापर करून ग्रामहिताला बाधा पोहचवणारे ठराव घुसडल्याचा आरोप स्थानिक सदस्यांनी केला आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

एकाच व्यक्तीला सात व्यापारी परवाने

कार्लुस डिसोझा नावाच्या व्यक्तीला सात व्यापारी परवाने जारी केले. हे परवाने देताना संबंधित विभागांचे आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते. ‘आऊटवर्ड रजिस्टर’मध्ये नोंदी करताना विसंगती आढळली असून, गोवा पंचायतराज कायदा १९९४ आणि ‘बीआरएपी’ नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 2027 चा मास्टरप्लॅन की आत्मघातकी पाऊल? विधानसभा निवडणुकीपूर्वी गिरीश चोडणकरांकडे धुरा; सत्तेसाठी काँग्रेसचा 'हाय-व्होल्टेज' डाव!

Goa Congress: गोव्यात काँग्रेस संपणार की पुन्हा उभारी घेणार? अस्तित्वाच्या आणि विश्वासार्हतेच्या सर्वात मोठ्या आवर्तनात पक्ष!

Goa Crime: 63 वर्षीय वृद्धेवरील अत्याचार प्रकरणात 28 वर्षीय तरुणाची निर्दोष मुक्तता; पोक्सो कोर्टाचा निकाल गोवा खंडपीठानं फिरवला

Sattari Forest Rights: सत्तरीतील वनहक्क दाव्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा हातोडा! 37 पैकी 26 अर्जांना अखेर मंजुरी; कागदपत्रांची कमतरता नडली

Maje Ghar Scheme: 350 कुटुंबांना मिळणार घरांची मालकी, राजेश फळदेसाई यांची मोठी घोषणा; हेडलॅण्ड, सडा येथील कुटुंबांना दिलासा

SCROLL FOR NEXT