Salcette School Dainik Gomantak
गोवा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Madgaon chaturthi bazaar: मडगावच्या पॉप्युलर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांतर्फे ‘चतुर्थीचा बाजार’ उपक्रम शनिवार, २३ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून राबविण्यात आला.

Sameer Amunekar

सासष्टी: मडगावच्या पॉप्युलर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांतर्फे ‘चतुर्थीचा बाजार’ उपक्रम शनिवार,२३ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून राबविण्यात आला. या बाजारात विद्यार्थ्यांनी माटोळीचे सामान, खाद्य पदार्थ व सजावटीच्या वस्तू विक्रीस उपलब्ध केल्या. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारलेला दिसला. पालकांनी व शिक्षकांनी त्यांना हा बाजार भरविण्यास प्रोत्साहित केले.

बाजाराचे उद्‍घाटन शिक्षण खात्याचे अधिकारी सुदन नाईक गावकर, दवर्लीचे सरपंच श्याम एम राजाध्यक्ष, हायस्कुलच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अवधुत प्रभू पर्रीकर, नवीन रायकर, वल्लभ रायकर, मुख्याध्यापिका सुचित्रा देसाई व इतर शिक्षक व पालक उपस्थित होते.

अवधूत पर्रीकर यांनी सांगितले की आताच्या मुलांना व्यवहार, बाजार करणे जमत नाही. त्यांना व्यवसायातील बारकाई समजत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना याची महिती मिळावी व जाणीव व्हावी म्हणून हा उपक्रम आम्ही राबविला. याची दखल इतर शाळांनीही घेणे आवश्यक आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य प्रशिक्षण व विकासाला महत्व देण्यात आले असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कौशल्या विकासास वाव मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

सुदन नाईक गावकर म्हणाले की या बाजारामुळे विद्यार्थ्यांना खरेदी व विक्री तसेच व्यवहारातील उलाढाल याचा चांगला अनुभव मिळेल. मुलांना अशा उपक्रमांसाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.

पालकांनी, शिक्षकांनी व परिसरातील नागरिकांनी बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यां कडील वस्तू विकत घेऊन त्यांना प्रोत्साहित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुकानातला QR कोड काढला आणि स्वतःचा लावला, महिला कर्मचाऱ्याने गंडवले मालकालाच; 49 लाख पळवले

Goa Assembly Election 2027: 'पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवणार'! उत्पल पर्रीकर यांनी केले जाहीर

'2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सुपर-8 मध्ये आफ्रिकेविरुद्ध भारत हारला तरी..', ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने भारतीय संघाबाबत असे काही बोलला की..

VIDEO: गॅसतुटवडा प्रकरण पेटले, सिलिंडर पोचवणाऱ्या गाडीवर कुंकळ्ळीत हल्ला; दोघे गंभीर

IPL 2026: संजू सॅमसन घेणार 'धोनी'ची जागा? दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा; उपकर्णधारपदाचे वर्तवले भाकीत

SCROLL FOR NEXT